शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
5
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
6
इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
7
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
9
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
10
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
11
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
12
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
14
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
15
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
16
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
19
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
20
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार: जेवणावळीतील कथित आचाऱ्याच्या कुटूंबातील पाचजण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 13:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील नऊ जणांसह रनाळे ता़ नंदुरबार येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत़ शनिवारी रात्री ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील नऊ जणांसह रनाळे ता़ नंदुरबार येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत़ शनिवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालातून १० जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते़ यात बहुचर्चित अशा खानसामाच्या संपर्कातील पाच जणांचे अहवालही पॉझिटिव्ह आले आहेत़धुळे वैद्यकीय महाविद्यालयातून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जामा मस्जिद भागात राहणाऱ्या ‘त्या’ खानसामाच्या कुटूंबातील तील ३८, २४, ४०, २२, २९ वर्षीय पुरुष, जिल्हा रुग्णालयात कार्यरत ३१ वर्षीय पुरुष तर ४२ वर्षीय महिला, रनाळे येथील पॉझिटिव्ह महिलेच्या कुटूंबातील १ तर नंदुरबार शहरातील लक्ष्मीनगर भागातील ५८ वर्षीय महिला आणि ३१ वर्षीय पुरुष अशा १० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत़ एकाच रात्रीत वाढलेल्या १० रुग्णांमुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता ६० झाली आहे़दरम्यान लक्ष्मीनगर भागातील दोघे पॉझिटिव्ह कल्याण येथील महिला नातेवाईकाच्या संपर्कात आल्याने त्यांना कोरोनाची लागण झाली होतीे़ आई आणि मुलगा दोघेही दोन दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयात दाखल होते़ त्यांच्या संपर्कातील नातेवाईक कल्याण येथे पॉझिटिव्ह आली आहे़ जामा मशिद भागातील पाच जणांच्या संपर्कातील तसेच रनाळे येथील रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचा प्रशासन शोध घेत आहे़ खानसामाच्या संपर्कातील थेट पाच जण पॉझिटिव्ह आल्याने चर्चेला उधाण आले आहे़नागरिकांकडून दक्षता व सतर्कता बाळगून उपाययोजना करुनच बाहेर पडावे तसेच लक्षणे दिसून आल्यानंतर तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल व्हावे असे नंदुरबार तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ़ जे़एच़ तडवी यांनी कळवले आहे़प्रशासनाकडून जामा मशिद, मण्यार मोहल्ला व लक्ष्मीनगर भागात रविवारी सकाळी फवारणी पूर्ण करण्यात आली आहे़