शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

झेडपी शाळेतील वर्गखोलीचा स्लॅब कोसळला; अंगणवाडी ताई जखमी, विद्यार्थी थोडक्यात बचावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 13:39 IST

ही वर्गखोली वापरण्यास योग्य नसल्याने शाळेचे विद्यार्थी येथे बसविले जात नव्हते. मात्र, येथेच अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना का बसविण्यात आले?

हदगाव: राजवाडी येथिल जिल्हा परिषद शाळेच्या जुन्या वर्गखोलीत अंगणवाडी भरते. सोमवारी ( दि. ३०) सकाळी अंगणवाडी सुरू असताना अचानक वर्ग खोलीचा स्लॅब अंगणवाडी ताईच्या डोक्यात कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. अंगणवाडी ताई यात जखमी झाल्या असून नशीब बलवत्तर म्हणून समोर बसलेले चिमुकले थोडक्यात बचावले. 

राजवाडी हे हदगाव तालुक्यातील शेवटच्या टोकाचे गाव असून लोकसंख्या ८९२ इतकी आहे. येथे पाचवीपर्यंत जिल्हा परिषद शाळा असून याच इमारतीमध्ये मागील काही दिवसांपासून अंगणवाडी देखील एका जुन्या वर्गखोलीत भरते. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे अंगणवाडीताई आणि १० विद्यार्थी जुन्या वर्गखोलीत उपस्थित होते. अंगणवाडी ताई कमल शिरगीरे या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माहितीवर काम करत होत्या. यावेळी अचानक खोलीचा स्लॅब कोसळून अंगणवाडी ताईच्या डोक्यावर कोसळला. यामध्ये त्या जखमी झाल्या. तर समोर बसलेले विद्यार्थी थोडक्यात बचावले. त्यांना उपचारासाठी तामसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. 

यापूर्वी ही अंगणवाडी गावातील एका मंदिरात भरविली जात असे. परंतु एक वर्षापासून जिल्हा परिषद शाळेतील एका जुन्या वर्गखोलीत भरवणे सुरू झाले. ही वर्गखोली वापरण्यास योग्य नसल्याने शाळेचे विद्यार्थी येथे बसविले जात नव्हते. मात्र, येथेच अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना का बसविण्यात आले असा सवाल ग्रामस्थ करत आहेत. 

अंगणवाडी व्हरांड्यातच भरवली जातेवर्गखोली जास्त जुनी नाही. अंगणवाडी व्हरांड्यातच भरवली जाते. मात्र, पाऊस आला तरच वर्गामध्ये विद्यार्थी बसतात. मला किरकोळ मार लागला असून सर्व विद्यार्थीवर सुरक्षित आहेत. - कमल शिरगीरे, अंगणवाडी 

नवीन इमारतीचा प्रस्ताव प्रलंबितअंगणवाडी इमारतीसाठी ग्रामपंचायतने अनेकदा संबंधित विभागाला ठराव दिला आहे. परंतु अद्याप मंजुरी मिळाली नाही. - साईनाथ फुलारी, सरपंच, राजवाडी

टॅग्स :NandedनांदेडEducationशिक्षणzp schoolजिल्हा परिषद शाळा