नांदेडमध्ये केवळ १०० रुपयांच्या वादातून युवकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 19:28 IST2019-03-20T19:27:41+5:302019-03-20T19:28:00+5:30
क्यात झालेल्या जबर मारहाणीत युवकाचा मृत्यू झाला.

नांदेडमध्ये केवळ १०० रुपयांच्या वादातून युवकाचा खून
नांदेड : शंभर रुपयांच्या किरकोळ वादावरुन एका युवकाचा लाकडाने मारुन खून केल्याची घटना १९ मार्चच्या पहाटे जुन्या नांदेड शहरातील देगलूरनाका येथे घडली. याप्रकरणी इतवारा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुन्या नांदेडातील फतेहबुरुज येथील शेख सलेमान शेख सरवर (१८) या युवकाचा दोघा जणांशी शंभर रुपयांसाठी वाद झाला. याच वादातून त्या दोघांनी शेख सुलेमान याला लाकडाने मारहाण केली. डोक्यात झालेल्या जबर मारहाणीत त्याचा मृत्यू झाला.
याप्रकरणी शेख माजिद यांनी दिलेल्या तक्रारीवरुन इतवारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गजभारे हे करीत आहेत़