नांदेडात सरकारचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून युवक काँग्रेसची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 17:29 IST2018-11-21T17:26:15+5:302018-11-21T17:29:41+5:30
शासन शेतकरी-युवकांच्या प्रश्नांवर सरकार असंवेदनशील असून त्याचा निषेध करीत युवक काँग्रेसच्यावतीने आज भोकर फाटा येथे सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

नांदेडात सरकारचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून युवक काँग्रेसची निदर्शने
नांदेड : मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळत नाही ,शासन शेतकरी-युवकांच्या प्रश्नांवर सरकार असंवेदनशील असून त्याचा निषेध करीत युवक काँग्रेसच्यावतीने आज भोकर फाटा येथे सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, जिल्हाध्यक्ष पप्पू पाटील,जिल्हा उपाध्यक्ष माधव कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्यात यावे ,मराठवाड्याचे हक्काचे पाणी मराठवाड्याला मिळावे,संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करावा यासह विविध मागणी साठी बुधवारी सकाळी आंदोलन करण्यात आले. युवक काँग्रेसचे भोकर विधानसभा अध्यक्ष मदन देशमुख कल्याणकर यांच्या पुढाकारातून आंदोलन करण्यात आले. यावेळी नांदेड जिल्ह्यातील युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्याची उपस्थिती होती.