शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
5
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
6
Operation Sindoor Live Updates: भारताचा कोणताही शत्रू वाचू शकत नाही, अमित शाहांची पोस्ट
7
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
8
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
9
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
11
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
12
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
13
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
14
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
15
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
16
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
17
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
18
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
19
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
20
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?

होय, नाते पुन्हा फुलू शकते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 00:15 IST

द्वेष चुकीचा आहे हे समजून घेतले पाहिजे. त्यासाठी दोघातील विसंवादाची पोकळी भरून निघाली पाहिजे. दुभंगलेल्या कुटुंबातील बाप आणि मुलगी एका वळणावर समोरासमोर येतात. आणि गैरसमज दूर होऊन मुलगी आणि वडिलांच्या नात्यातील पोकळी भरुन निघते. नाते पुन्हा फुलू शकते हाच निर्मळ संदेश बुधवारी ‘नथिंग टू से’ नाटकाने दिला.

ठळक मुद्देराज्य नाट्यस्पर्धा : 'नथिंग टू से' प्रेक्षकांना भावले

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : द्वेष चुकीचा आहे हे समजून घेतले पाहिजे. त्यासाठी दोघातील विसंवादाची पोकळी भरून निघाली पाहिजे. दुभंगलेल्या कुटुंबातील बाप आणि मुलगी एका वळणावर समोरासमोर येतात. आणि गैरसमज दूर होऊन मुलगी आणि वडिलांच्या नात्यातील पोकळी भरुन निघते. नाते पुन्हा फुलू शकते हाच निर्मळ संदेश बुधवारी ‘नथिंग टू से’ नाटकाने दिला.हौशी राज्य नाट्यस्पर्धेच्या चौथ्या दिवशी कुसुम सभागृहात दुपारी चार वाजता निष्पाप कला निकेतन, कोल्हापूर या संस्थेच्या वतीने प्रसाद दानी लिखित प्रताप सोनाळे दिग्दर्शित ‘नथिंग टू से’ या नाट्यप्रयोगाचे सादारीकरण झाले. बाप आणि मुलगी याचं नातं अगदी तरल.बाबा मुलीला बोटाला धरून चालविण्यापासून ते लग्नापर्यंत साथ, आधार देतात, मुलीला वडिलांकडून मिळणारे प्रेम, शिकवण, रडणं , हसणं आणि स्पर्श यातून नात फुलत जातं; पण काही मुलांच्या बाबतीत वडिलांकडून ही संधी मिळत नाही. त्यामुळे नातं असूनही अंतर पडते. आणि नात्यामध्ये पोकळी निर्माण होते. आईवडिलांचा घटस्फोट, मूल आईकडं जातं, वडिलांना पोरकं होतं. मुलाच्या मनात भावनिक पोकळी निर्माण होते. आणि वडील मुलाचं नातं दुरावत एकमेकांविषयी समज-गैरसमज निर्माण होतात आणि कारण न जाणताच एकमेकांविषयी द्वेष निर्माण होतो.बाप आणि मुलगी नात्यातील माणूस व नातं समजून घेता येणे म्हणजेच नथिंग टू से... तीन पात्र असलेल्या या नाटकात संतोष अबाळे, तनुजा मिराशी, प्रकाश रावळ यांनी उत्तम भूमिका साकारली तर नेपथ्य- विनय शिंदे, पार्श्वसंगीत- सलमान मोमीन, प्रकाशयोजना- प्रताप सोनाळे, वेशभूषा- आनंद दमणगे, रंगभूषा- सुनीता वर्मा यांनी साकारली.‘समीकरण’ने दिला नाते शिकविणारा नाट्यानुभवअशाच मुली आणि वडिलांच्या भावविश्वावर आधारित नाट्यानुभव घेता आला ते समीकरण या नाटकातून. मराठवाडा मित्रमंडळ अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणेच्या वतीने सादर झालेले नेहा चासकर लिखित, अदिती द्रविड दिग्दर्शित समीकरण हे नाटक नात्यातील समीकरण शिकवून जाते. पॅरीलीसने आजारी पडलेले वडील शास्त्रज्ञ वडील ( अंबर गणपुले )आणि त्यांची छोटी मुलगी आभा ( मानसी भवाळकर ) आणि मोठी मुलगी शर्वरी (शिवानी दामले ) या तिघांवर आधारित ही कथा प्रेक्षकांचे डोळे पाणावते. यात छोटी मुलगी आभा हिचा संघर्ष या नाटकातून दिसतो. या नाटकातील डॉक्टर (अमोघ वैद्य) , सारंग ( नितीश सप्रे ) यांची भूमिकाही लक्षवेधी ठरली. मानसी भवाळ यांनी आपल्या अभिनयाने बाजी मारली तर अंबर गणपुले याने आपल्या वडिलांच्या भूमिकेने रसिकांची मने जिंकली.