शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

डोक्यात दगडाने वार करून महिलेचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 00:39 IST

शहराच्या पूर्व दिशेला भूमीअभिलेख कार्यालयाच्या बाजूला असलेल्या बेल्लोरीच्या एका छोट्या नाल्याच्या काठावर ३० वर्षीय महिलेच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना २३ फेब्रुवारी रोजी दुपारी उघड झाली़

किनवट : शहराच्या पूर्व दिशेला भूमीअभिलेख कार्यालयाच्या बाजूला असलेल्या बेल्लोरीच्या एका छोट्या नाल्याच्या काठावर ३० वर्षीय महिलेच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना २३ फेब्रुवारी रोजी दुपारी उघड झाली़ मयतावर बलात्कार करून खून झाला असावा असा संशय आहे. मयताच्या उजव्या हातावर मुक्ता इंगळे असे नाव गोंदलेले असल्याने तिची ओळख पटविण्यास मदत झाली.मयत महिला ही माळबोरगाव येथील असून तिचे सासर विदर्भातील पुसद तालुक्यातील लोणधरी येथील आहे. गतवर्षी तिच्या पतीचे निधन झाले.मयत मुक्ता इंगळे हिला दोन मुली असून ती माहेरी माळबोरगाव येथे राहत होती़ एक मुलगी दुसऱ्या वर्गात तर दुसरी मुलगी सहा वर्षांची आहे़ मांडवा (किनवट) येथील अनुदानित आश्रमशाळेत दुसºया वर्गात शिकणाºया आपल्या मुलीला सोडण्यासाठी ती २२ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन ते चारचे दरम्यान आली होती़ त्यानंतर ती परत गेली़ ती एका दुचाकीवर आली होती, असे शिक्षक व पोलिसांचे म्हणणे आहे़ हा खून अनैतिक संबंधातून २२ फेब्रुवारीच्या रात्री झाल्याचा पोलिसांचा संशय आहे़घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दिलीप तिडके, पीएसआय मलय्या स्वामी, अनिल कांबळे, गणेश चिते, पोहेकॉ पांढरे, पोकॉ गणेश केजकर, शिवाजी चुनमवार, किशोर मेश्राम, मधुकर पांचाळ, नारायण संदूपटलावार यांनी व महिला पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला़ मयताच्या डोक्यावर दगड घालून खून केला़ घटनास्थळी पर्स व कंडोम मिळून आले़ त्यामुळे बलात्कार करून खून झाला असावा, अशी चर्चा आहे़ज्या ठिकाणी खून झाला त्या परिसरात जिकडेतिकडे दारूच्या रिकाम्या बाटल्या दिसून आल्या़ मारेकºयाच्या शोधासाठी श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक तिडके यांनी दिली़पत्नी पळून गेल्याचा मानसिक धक्का बसल्याने दोन अपत्यांना समोसा व पेढ्यात विष टाकून जिवे मारल्यानंतर स्वत:ही तिथेच विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना ९ फेब्रुवारी रोजी किनवट तालुक्यातील वडोली जंगलात उघड झाली़ हे प्रकरण ताजे असताना आज २३ फेब्रुवारी रोजी खुनाची घटना उघड झाली.

टॅग्स :NandedनांदेडMurderखूनCrime Newsगुन्हेगारीNanded policeनांदेड पोलीस