मराठवाड्यातील रेल्वे विकासाबाबत दक्षिण-मध्य रेल्वेचा दुजाभाव कशासाठी ? अशोक चव्हाण यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2021 08:00 PM2021-11-22T20:00:05+5:302021-11-22T20:04:00+5:30

Ashok Chavan: मराठवाड्यातील रेल्वे विकासाच्या प्रश्नांबाबत व्यापक भूमिका घेणे गरजेचे

Why the negligence of South Central Railway regarding railway development in Marathwada ? Question by Ashok Chavan | मराठवाड्यातील रेल्वे विकासाबाबत दक्षिण-मध्य रेल्वेचा दुजाभाव कशासाठी ? अशोक चव्हाण यांचा सवाल

मराठवाड्यातील रेल्वे विकासाबाबत दक्षिण-मध्य रेल्वेचा दुजाभाव कशासाठी ? अशोक चव्हाण यांचा सवाल

googlenewsNext

नांदेड : अलिकडच्या काही वर्षात मराठवाड्यातील रेल्वे उड्डाण पुलाच्या कामांबाबत अक्षम्य दिरंगाई होत आहे. भोकर येथील रेल्वे उड्डाण पुलाचे काम हे त्या दुजाभावाचे प्रतिक आहे. एका बाजुला वाहतुकीची होणारी कोंडी तर दुसऱ्या बाजुला रेल्वे विभागाकडून कामामध्ये केली जाणारी दिरंगाई ही न समजण्यापलीकडची आहे. या दिरंगाईमुळे सर्वसामान्य नागरिकांनाही अतोनात त्रास सहन करावा लागला. दक्षिणमध्य रेल्वेची मराठवाड्याच्या विकासाकडे पाहण्याची दृष्टी दुजाभाव करणारी आहे (negligence of South Central Railway regarding railway development in Marathwada) , अशा संतप्त भावना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण ( Ashok Chavhan ) यांनी व्यक्त केली.

नांदेड जिल्ह्यातील हदगाव-तामसा-भोकर-उमरी रस्त्याच्या रेल्वे उड्डाण पुलावरील वाहतूकीचे आज सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी विधान परिषद सदस्य अमर राजूरकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, माजी आमदार अमिता चव्हाण, भोकरचे नगराध्यक्ष विनोद चिंचाळकर, जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे, कार्यकारी अभियंता प्रशांत कोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
 
पुढे बोलताना मंत्री चव्हाण म्हणाले, भोकर येथील आज उद्घाटन झालेल्या उड्डाण पुलाला सन २०१६ मध्ये मान्यता प्रदान केली गेली. अनेक वर्षे हे काम प्रलंबित होते. या प्रलंबित असलेल्या कामाला मागील २ वर्षात युद्ध पातळीवर गती देऊन हा पूल वाहतुकीसाठी खुला करतांना मला आत्मिक समाधान होत असल्याची भावना यावेळी मंत्री चव्हाण यांनी व्यक्त केली. या पुलाच्या भुयारी मार्गाच्या कामाची पूर्तता येत्या ३ महिन्यात करू असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच मराठवाड्यातील रेल्वे विकासाच्या प्रश्नांबाबत व्यापक भूमिका घेणे गरजेचे असून याबाबत लवकरच रेल्वे मंत्रालय, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी मी चर्चा करेल असे ही मंत्री चव्हाण यांनी स्पष्ट केले. 

दर्जा व वेळेवर निर्मिती यात तडजोड नाही
विकास कामांना मिळणारा निधी हा अनेक आव्हानातून मिळावावा लागतो. ज्या विकास कामांसाठी आपण हा निधी आणलेला आहे त्या कामांवरच हा निधी कामातील गुणवत्तेसह दिलेल्या कालमर्यादेत कामे पूर्ण करुन घेऊन खर्ची घालणे हे प्रत्येक विभाग प्रमुखांचे कर्तव्य आहे. रस्ते विकासासह इतर कामात जर काही गडबड आढळली तर खुशाल आमच्याकडे तक्रार करा आम्ही वेळेवर त्याचा बंदोबस्त करु, असे आवाहन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.

Web Title: Why the negligence of South Central Railway regarding railway development in Marathwada ? Question by Ashok Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.