रॅलीत देबासीस मुजूमदारसह अकरा जणांचा समावेश आहे. नांदेड येथील सचखंड गुरुद्वारा येथे दर्शन घेऊन शहरभर रॅली काढण्यात आली. या रॅलीचे आयोजन युवा विकास केंद्र, निफा व त्रिपुरा राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली आहे. देशामध्ये शांतता नांदावी एकोपा राहावा, समता-बंधुता वाढावी, यासाठी ही रॅली काढण्यात आली आहे. आत्मनिर्भर होण्यासाठी युवकांनी पुढे यावे, वृक्षारोपण व रक्तदान करण्यासाठी युवकांना जागृत करण्याचे काम या रॅलीतून करण्यात येत आहे. सचखंड गुरुद्वारा येथे बाबाजी व कार सेवावाले बाबा बलविंदर सिंग यांच्या हस्ते सर्व यात्रेकरूंचा सन्मान सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर म्हणाले, त्रिपुरा राज्यातील प्रमुखाने स्किलवर जास्त भर देण्यात आला आहे. त्यामध्ये तिकडे बांबू लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. बांबूपासून विविध लोणचे, बॉटल असे साहित्य बनवण्यात येतात. हे साहित्य नांदेड शहरामध्ये पण युवकांना तसेच शेतकरी यांनी तयार करावे यासाठी नांदेड येथे आपणही असे प्रयत्न करू, असे प्रतिपादन केले.
यावेळी नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे, पत्रकार शंतनु डोईफोडे, भाजप महानगर अध्यक्ष प्रवीण साले, निफाचे हर्षद शहा निफा, माध्यमशास्र संकुलाचे संचालक डॉ. दीपक शिंदे, स्थायी समिती सदस्य किशोर स्वामी यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. भरत जेठवाणी प्रदेश अध्यक्ष निफा महाराष्ट्र यांच्या नेतृत्वाखाली नांदेड येथील सर्व कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडले. यावेळी निफाचे सदस्य भास्कर डोईबळे, गणेश चाडोळकर, सुश्मिता देशमुख, साईनाथ कुलथे, आकाश बागडे, नईम खान, जगबीरसिंग सोडी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.