जिल्ह्यावर पाणीटंचाईचे सावट, २३५ योजनांची करणार दुरुस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:31 IST2021-03-04T04:31:50+5:302021-03-04T04:31:50+5:30
चौकट....... सध्या एकही टँकर सुरू नाही...... पाण्याच्या उपलब्धतेमुळे मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात टँकरची गरज भासलेली नाही. मात्र येणाऱ्या ...

जिल्ह्यावर पाणीटंचाईचे सावट, २३५ योजनांची करणार दुरुस्ती
चौकट.......
सध्या एकही टँकर सुरू नाही......
पाण्याच्या उपलब्धतेमुळे मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात टँकरची गरज भासलेली नाही. मात्र येणाऱ्या दिवसात ३४ गावे आणि १४ वाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठ्याची वेळ येऊ शकते. यासाठी मार्च महिन्याकरिता ४९ टँकरचे नियोजन करण्यात आले असून यासाठी १ कोटी १८ लाख ८० हजारांचा खर्च अपेक्षित आहे.
असा आहे कृती आराखडा....
मार्च महिन्यातील संभाव्या पाणी टंचाईला तोंड देण्यासाठी प्रशासनाने ३० कोटी ४२ लाखांचा कृती आराखडा तयार केला आहे. यामध्ये ६०८ विंधन विहिरी, २३५ नळ योजनांची दुरुस्ती, १६९ पूरक नळ योजना, १२०२ विंधन विहिरींची दुरुस्ती तसेच ४३८ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्याचे निश्चित केले आहे.
विंधन विहिरीवर राहणार भर...
प्रशासनाने १५६ वाड्या आणि ४२७ गावांसाठी विंधन विहिरी घेण्याचे निश्चित केले आहे. यासाठी ३ कोटी ९५ लाख खर्च अपेक्षित आहे. त्याच वेळी २७९ गावे आणि ९० वाड्यांसाठी १ कोटी ७३ लाख रुपये खर्चून खासगी विंधन विहीरींचे अधिग्रहण करण्यात येणार असून त्याद्वारे टंचाईग्रस्त भागाला पाणी पुरविण्यात येणार आहे.
४९ टँकरची लागणार गरज...
मार्च महिन्यात अद्यापपर्यंत जिल्ह्यात एकही टँकर सुरू नाही. मात्र ३१ मार्चपर्यंत काही भागात पाणीटंचाई निमार्ण होण्याची शक्यता आहे. यासाठी ३४ गावे आणि १४ वाड्यांना ४९ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी १ कोटी १८ लाख ८० हजार खर्च अपेक्षित आहे.