शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नेपाळ्यांचा भारतीय सीमेत घुसून हल्ला; वनविभागाच्या पाच चौक्या जाळल्या
2
उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
3
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
4
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
5
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
6
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
7
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
8
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
9
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
10
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
11
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
12
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
13
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
14
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
15
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
16
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
17
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
18
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
19
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
20
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला

हदगावमध्ये ऐन दिवाळीत पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 11:44 PM

शहरवासियांसाठी ही दिवाळी स्मरणात राहणारी ठरली़ कारण पाणी शोधण्यासाठी घराबाहेर पडावे लागले़ त्यानंतरच दिवाळीचे अभ्यंगस्रान करावे लागले़

हदगाव : शहरातील नळयोजनेच्या विंधन विहिरीला पाणी नसल्याने शहराला आठवड्यापासून पाणी मिळत नाही़ शहरवासियांसाठी ही दिवाळी स्मरणात राहणारी ठरली़ कारण पाणी शोधण्यासाठी घराबाहेर पडावे लागले़ त्यानंतरच दिवाळीचे अभ्यंगस्रान करावे लागले़नोव्हेंबर महिन्यात नदीला पाहिल्याच आठवड्यामध्ये रबीसाठी पाणी सोडले जाते़ त्यामुळे शहराचीही तहान भागते मात्र यावर्षी अनेक ठिकाणी कामे सुरू असल्यामुळे पाणी सोडता आले नाही़ शहराची तहान भागविण्यासाठी राखीव असलेले पाणी नगरपालिकेला जतन करता आले नाही़ यामुळे गोंधळ उडाला़ ऐन दिवाळी सणालाच पाण्याची टंचाई सुरू झाली़ ज्यांच्याकडे पाण्याची पर्यायी व्यवस्था नाही़ ते दत्ताबर्डी तांडा येथील शेतातून पाणी आणत आहेत़ सकाळी फराळ पाण्याचा आनंद घेण्याऐवजी फराळ घरात असूनही पाण्याअभावी तो खाता आला नाही़ पाणी भरल्यानंतरच दुपारी त्यांना सण साजरा करता आला़नदीला पाणी सोडले तरीही पाण्याचा प्रवाह कमीच ठेवावा लागत असल्यामुळे पाणी शहरापर्यंत पोहचण्यासाठी ११ नोव्हेंबर उजाडणार आहे़ त्यानंतर १२ नोव्हेंबरला नळाला पाणी येण्याची शक्यता वर्तविली जात आहे़ हिवाळ्यामध्ये सुरूवातीलचा शहरवासियांना पाणी टंचाई भासल्याने उन्हाळ्यात काय होईल, याची चिंता महिलावर्गांना लागली आहे़ शहरातील रखडलेली पाणी पुरवठा योजना कार्यान्वीत करण्यासाठी नगराध्यक्षा ज्योती राठोड यांनी प्रयत्न केले़ त्यासाठी वाढीव निधी मिळाल्याचेही सांगण्यात आले़ मात्र योजनेचे काम अद्याप सुरू झाले नाही़ शहरातील जनतेची तहान भागविण्यासाठी ही योजना सुरू करणे अत्यंत आवश्यक आहे़ अन्यथा हदगाव शहरालाही टँकरद्वारे पाणी पुरवर्ठा करण्याची वेळ नगरपालिकेवर येणार आहे़विकासकामे करण्यासाठी मी- तू करणारे नगरसेवक पाण्याच्या नियोजनासाठी एक शब्दही बोलण्यास तयार नाहीत़ तर विरोधक केवळ स्टंटबाजी करताना दिसत आहेत़ आगामी निवडणुकीत पाण्याची समस्या गंभीर होणार आहे़उन्हाळ्याची चिंता आतापासूनच

  • हिवाळ्यामध्ये सुरूवातीलचा शहरवासियांना पाणी टंचाई भासल्याने उन्हाळ्यात काय होईल, याची चिंता महिलावर्गांना लागली आहे़ शहरातील रखडलेली पाणी पुरवठा योजना कार्यान्वीत करण्यासाठी नगराध्यक्षा ज्योती राठोड यांनी प्रयत्न केले़ त्यासाठी वाढीव निधी मिळाल्याचेही सांगण्यात आले़ मात्र योजनेचे काम अद्याप सुरू झाले नाही़
  • ऐन दिवाळी सणालाच पाण्याची टंचाई सुरू झाली़ नागरिकांना दत्ताबर्डी तांडा येथील शेतातून पाणी आणावे लागले़
टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीwater shortageपाणीटंचाईwater scarcityपाणी टंचाई