शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

किनवट तालुक्यात ५० गावांना पाणीटंचाईच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:55 AM

तालुक्यात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे भूगर्भातील पाणीपातळी खोल गेली आहे. नदी, नाले कोरडे पडले असून प्रकल्पातील साठ्यात घट होत असल्याने तालुक्यातील ५० हून अधिक गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे़ सर्वाधिक टंचाईची झळ मांडवी, उमरी (बा़) सर्कलमध्ये बसू लागल्याचे चित्र आहे़

ठळक मुद्देमांडवी, उमरी सर्कलला फटका : विहीर, बोअर अधिग्रहणाचे ७० प्रस्ताव मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्ककिनवट : तालुक्यात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे भूगर्भातील पाणीपातळी खोल गेली आहे. नदी, नाले कोरडे पडले असून प्रकल्पातील साठ्यात घट होत असल्याने तालुक्यातील ५० हून अधिक गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे़ सर्वाधिक टंचाईची झळ मांडवी, उमरी (बा़) सर्कलमध्ये बसू लागल्याचे चित्र आहे़किनवट या डोंगराळ तालुक्यात १९१ महसुली गावे, १०५ वाडी-तांडे असून १३४ ग्रामपंचायती आहेत़ तालुक्याची वार्षिक पर्जन्यमानाची सरासरी १ हजार २४० मि़मी़ इतकी असताना २०१७ च्या पावसाळ्यात ५६० मि़मी़ म्हणजे ४५ टक्के इतकाच पाऊस झाल्याने तालुक्यातील बहुतांश नाले पावसाळ्यातच कोरडे पडले़ प्रकल्पातही पाणीसाठा झालाच नाही़ पावसाळ्यात भूगर्भाची पातळी वर आलीच नाही़ त्यामुळे नोव्हेंबर-डिसेंबरपासूनच काही गावांना टंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली़ संभाव्य पाणीटंचाईचे संकट उद्भवू नये व त्यावर उपाययोजना राबविण्याच्या दृष्टीने पंचायत समितीने तात्काळ टंचाई आराखडा तयार करून जिल्हा प्रशासनाकडे पाठवून मंजुरी मिळवून घेतली़विहीर, बोअर अधिग्रहणाचे ७० प्रस्ताव पं़ स़ च्या पाणीपुरवठा विभागाकडे प्राप्त झाले़ त्यापैकी ४३ प्रस्ताव तहसीलला पाठविले़ त्यातील चार प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे़ पाथरी, उमरी बा़, वडोली, निराळा तांडा, पळशी, अंबाडी, टेंभी, निराळा, सारखणी, मानातांडा, गोंडे महागाव, निचपूर, मार्लागुंडा, दरसांगवी (चि़), मोहाडा, लिंगी, नागझरी, रोडानातांडा, अंबाडी तांडा, सिरपूर, दुंड्रा, दीपलाना तांडा, चिंचखेड, रामपूर, नंदगाव, भिसी, तोटंबा, दिग्रस, मलकजांबतांडा, वाळकी बु़, सालाईगुडा, दयालधानोरा, कनकवाडी, नागापूर, कोपरा, सावरगाव, इरेगाव, बोधडी खु़, तल्हारी, कमठाला, मारेगाव खा़सह त्या-त्या ग्रा.प.अंतर्गत येणाऱ्या वस्त्यांचे विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव आल्याने तालुक्यात पाणीटंचाईने डोके वर काढले आहे़६४७ पैकी ६३० हातपंप सुरूतालुक्यात ६४७ हातपंप असून त्यातील ६३० सुरू आहेत़ मात्र पाणीच नसल्याने ४० हातपंप बंद आहेत़ ३५ हातपंप नादुरुस्त आहेत़ नादुरुस्त हातपंप दुरुस्तीचे काम पाणीपुरवठा विभागाने सुरु केले आहे़ धानोरा सी़ व मारेगाव (वरचे) या दोन गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे़

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईriverनदी