शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळात पाणीप्रश्न मिटला; श्रमदानातून काटकळंबाची पाणीदार गावाकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 14:31 IST

ऐन उन्हाळ्यात या गावात २० ते २५ फुटांवर पाणी उपलब्ध आहे. 

ठळक मुद्दे२०१६ ते २०१८ या कालावधीत संस्कृती संवर्धन संस्थेच्या माध्यमातून काम सुरूजलसंधारणाच्या कामाद्वारे टँकरमुक्त अशी नवी ओळख प्राप्त केली आहे़ 

- गोविंद शिंदेबारुळ (जि़नांदेड) : कंधार तालुक्यातील सर्वाधिक दुष्काळी गाव म्हणून काटकळंबाची एकेकाळी ओळख होती़ अनेक वर्षे तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसलेल्या या गावाने श्रमदानातून जलसंधारणाचे काम हाती घेतले आणि बघता बघता  पाणीदार गावाकडे वाटचाल सुरू झाली आहे़ सध्या कंधार तालुक्यातील अनेक गावांना टंचाईच्या झळा सोसाव्या लागत असताना काटकळंबावासीय मात्र पाण्याबाबत निर्धास्त आहेत़  

मानार धरणाच्या शेजारी अवघ्या चार कि़मी़ अंतरावरील हे गाव. धरणाशेजारी असूनही दर उन्हाळ्यात ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागत असे़ टँकरग्रस्त गाव अशीच या गावाची ओळख निर्माण झाली होती़ शेजारील उमरा येथील एका संस्थेत सहशिक्षक म्हणून कार्यरत असलेले गावचे भूमीपूत्र बाबुराव बस्वदे गुरुजी यांनी यातून मार्ग काढण्याचा निश्चय केला़ २०११ मध्ये अण्णा हजारे यांच्या राळेगाणसिद्धीला गावातील काही जणांसोबत भेट दिली आणि तेथे जलसंधारणाचे काम कशा पद्धतीने झाले, याची माहिती घेतली़ पुढे २०१२ मध्ये काटकळंबा पाणीदार गाव करण्याचा संकल्प  गावाने केला़ 

सुरुवातीला ग्रामस्वच्छता, नालीसफाई आदी उपक्रम लोकसहभागातून राबविण्यात आले़ यामुळे गावात एकोपा निर्माण झाला़  क्षारयुक्त पाणी पिवून ग्रामस्थ आजारी पडत असल्याचे लक्षात आल्यानंतर गुरुजींनी शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळीच्या माध्यमातून आंध्रप्रदेशातील बालविकास संस्थेकडे पाठपुरावा केला़ त्यातून जलशुद्धीकरण प्रकल्प मंजूर करून घेतला़ २०१५ मध्ये या गावाला तीव्र पाणीटंचाईचा फटका सोसावा लागला़ यानंतर ग्रामस्थांनी जलसंधारणाच्या कामाला आणखी गती दिली़

नेकमे काय केले?२०१६ ते २०१८ या कालावधीत संस्कृती संवर्धन संस्थेच्या माध्यमातून नाला खोलीकरण व रुंदीकरण (डोह मॉडेल) काम हाती घेण्यात आले़ केअरींग फ्रेंडस्, नाम फाऊंडेशन व राज्य शासनाच्या सहकार्याने गाव परिसरात ६ कि़मी़च्या नाल्याचे डोह पद्धतीने खोदकाम करण्यात आले़ या बरोबरच जलदूत प्रकल्पही राबविण्यात आला़ शिवारातील ५० एकर पडीक जमिनीवर कृषी विभागाच्या माध्यमातून खोल सलग समतल चराचे काम पूर्ण करण्यात आले़ काही बांध बंधिस्तीची कामेही पूर्ण झाली़ त्यानंतर शेततळी, गांडूळ खत युनिट आदींवर लक्ष केंद्रीत करण्यात आले़ रोगराई टाळण्यासाठी व वैयक्तिक स्वच्छतेसाठी गाव पाणंदमुक्त झाले़ सिंचन विभागाकडून चार सिमेंट बंधारेही बांधून घेण्यात आले़ एकूणच काटकळंबा शिवारातील १५ टक्के  शिवारात मृद व जलसंधारणाची कामे शास्त्रशुद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात आल्याने पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत झाली़  

टँकरमुक्त गावआजघडीला कंधार आणि शेजारच्या लोहा तालुक्यातील अनेक गावे पाणीटंचाईने व्याकुळ असताना काटकळंबावासियांना मात्र पुरेसे पाणी उपलब्ध आहे़ एकेकाळी टँकरयुक्त अशी ओळख झालेल्या या गावाने जलसंधारणाच्या कामाद्वारे टँकरमुक्त अशी नवी ओळख प्राप्त केली आहे़ 

अवघ्या २५ फुटांवर पाणी उपलब्धबाबुराव बस्वदे गुरुजी यांनी गावशिवारातील मृद व जलसंधारणाची कामे पूर्ण झाल्याशिवाय पायात चप्पल न घालण्याची प्रतीज्ञा केली. गावचे भूमीपूत्र तथा मिराभार्इंदर मनपाचे उपायुक्त डॉ़संभाजीराव पानपट्टे यांनीही गुरुजींना  मोलाची साथ दिली़ केअरींग फे्रंडस्सह शासकीय विभाग आणि इतरांशी समन्वय साधण्याचे काम सगरोळीच्या संस्कृती संवर्धन मंडळाचे अध्यक्ष प्रमोद देशमुख यांनी केले़ त्यामुळेच गावाचा चेहरामोहरा बदलला. सद्यस्थितीत ऐन उन्हाळ्यात या गावात २० ते २५ फुटांवर पाणी उपलब्ध आहे. 

टॅग्स :droughtदुष्काळWaterपाणीNandedनांदेड