शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या संपकरी १०४७ कर्मचाऱ्यांना अल्टीमेटम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 12:09 AM

कामावर रुजू व्हा अन्यथा कार्यमुक्त करण्याचा इशाराही देण्यात आला आहे़ त्यामुळे आरोग्य कर्मचा-यांमध्ये खळबळ उडाली असून याबाबत शनिवारी निर्णय घेण्यात येणार असल्याचे संघटनेच्या वतीने कळविण्यात आले आहे़

ठळक मुद्दे८ मे पासून आंदोलन : कामावर हजर व्हा अन्यथा कार्यमुक्त करण्याचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शासकीय सेवेत विनाशर्त समायोजन आणि समान काम समान वेतन या प्रमुख मागण्यांसाठी ८ मे पासून पुन्हा बेमुदत संप पुकारणाºया जिल्ह्यातील राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या १०४७ कर्मचा-यांना शासनाने ४८ तासांचा अल्टीमेटम दिला आहे़ कामावर रुजू व्हा अन्यथा कार्यमुक्त करण्याचा इशाराही देण्यात आला आहे़ त्यामुळे आरोग्य कर्मचा-यांमध्ये खळबळ उडाली असून याबाबत शनिवारी निर्णय घेण्यात येणार असल्याचे संघटनेच्या वतीने कळविण्यात आले आहे़राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत गेल्या दहा वर्षांपासून विविध पदांवर कार्यरत असलेल्या जिल्ह्यातील १ हजार ४७ कर्मचा-यांनी बुधवारपासून पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले होते़ यापूर्वीही कर्मचा-यांनी आंदोलन केले होते़ परंतु, त्यावेळी केवळ आश्वासनावर त्यांची बोळवण करण्यात आली होती़ २१ एप्रिल रोजी आरोग्यमंत्री दीपक सावंत, आयुक्त यांच्यासोबत झालेल्या बैठकीत त्रिसदस्यीय समिती स्थापन करुन दहा दिवसांच्या आत विषय निकाली काढण्याचे आश्वासन देण्यात आले होते़ त्यामुळे कंत्राटी कर्मचा-यांनी आंदोलन स्थगित केले होते़ त्यानंतर सर्व कर्मचारी २३ एप्रिलपासून कार्यालयात रुजू झाले होते़ परंतु आरोग्य विभागाने अद्यापही कर्मचा-यांना दिलेले आश्वासन पाळले नाही़ आंदोलनाला स्थगिती देण्याचीही ७ मे रोजी मुदत संपली होती़ त्यामुळे कर्मचा-यांनी ८ मे पासून पुन्हा आंदोलनाला सुरुवात केली़ ८ ते १४ मे दरम्यान कामबंद तर १४ मे पासून नाशिक ते मुंबई लाँगमार्च काढण्यात येणार होता़ दरम्यान, राज्यभरात संपामुळे आरोग्य सेवा विस्कळीत झाल्यामुळे शासनाने कठोर भूमिका घेतली आहे़ ४८ तासांच्या आत हे कर्मचारी कामावर रुजू न झाल्यास त्यांना तातडीने कार्यमुक्त करण्यात यावे़ त्यांच्या जागी नवीन पदभरती करण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत़दरम्यान, आरोग्य कर्मचारी संघटनेचे जुनेद म्हणाले, ४८ तासांच्या अल्टीमेटचे आयुक्तांचे पत्र मिळाले आहे़ शुक्रवारी दिवसभर आंदोलन सुरु होते़ अल्टीमेटच्या विषयावर शनिवारी काय तो निर्णय घेण्यात येईल, असेही ते म्हणाले़

टॅग्स :NandedनांदेडHealthआरोग्यEmployeeकर्मचारी