गुरूंची भेट अधुरी राहिली; त्यागी महाराजांचा बिहारमध्ये अपघातात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2022 12:53 IST2022-02-11T12:47:26+5:302022-02-11T12:53:40+5:30

अपघात एवढा भीषण होता की कार मधील योगी त्यागी महाराज आणि बळीराम विक्रम पुयड यांचा जागीच मृत्यू झाला.

Tyagi Maharaj from Nanded died in an accident in Bihar | गुरूंची भेट अधुरी राहिली; त्यागी महाराजांचा बिहारमध्ये अपघातात मृत्यू

गुरूंची भेट अधुरी राहिली; त्यागी महाराजांचा बिहारमध्ये अपघातात मृत्यू

नांदेड :  उत्तराखंड येथील गुरूंच्या भेटीसाठी निघालेल्या नांदेड तालुक्यातील पुणेगाव येथील त्यागी महाराज यांच्यासह अन्य एकाचा कार अपघातात बिहारमध्ये मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी पहाटे घडली. या अपघातात कारमधील इतर पाच जण जखमी झाले आहेत. 

पुणेगाव येथील मठाचे योगी त्यागी महाराज यांचे जिल्ह्यासह राज्यभरात भक्त आहेत. दरवर्षी ते पुणेगाव येथे धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करतात. त्या निमित्त उत्तराखंड येथील गुरूंच्या भेटीसाठी ते दोन दिवसांपूर्वी पुणेगाव येथून कारने निघाले होते. चालकासह या कार मध्ये सात जण होते. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास त्यांची कार बिहार राज्यातील चाळीसगाव परिसरात आली असताना चालकाचा डोळा लागल्याने कारची ट्रकला पाठीमागून धडक बसली. 

अपघात एवढा भीषण होता की कार मधील योगी त्यागी महाराज आणि बळीराम विक्रम पुयड यांचा जागीच मृत्यू झाला. तर आमदूरा आणि माळ कौठ येथील चार जण अन चालक जखमी झाले आहेत. त्यागी महाराज यांच्या मृत्यूची माहिती मिळताच पुणेगाव वर शोककळा पसरली आहे. मठ परिसरात शिष्यांनी मोठी गर्दी जमली होती.

Web Title: Tyagi Maharaj from Nanded died in an accident in Bihar