मित्राच्या खुनाचा बदला घेण्यासाठी दोन तरुणांवर खंजरने प्राणघातक हल्ला
By शिवराज बिचेवार | Updated: August 22, 2023 16:30 IST2023-08-22T16:29:51+5:302023-08-22T16:30:57+5:30
या प्रकरणात विमानतळ पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.

मित्राच्या खुनाचा बदला घेण्यासाठी दोन तरुणांवर खंजरने प्राणघातक हल्ला
नांदेड : चुलत भावाने मित्राचा खून केला. त्यावेळी तू भावाला मदत का केली, असे म्हणून तिघांनी दोन तरुणांवर खंजरने प्राणघातक हल्ला केला. ही घटना आनंदनगर ते विद्युतनगर रस्त्यावर २० ऑगस्ट रोजी घडली. या प्रकरणात विमानतळ पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. शुभम राजूसिंह सूर्यवंशी (रा. समर्थनगर) हा तरुण मित्रासोबत आनंदनगर रस्त्यावरील कंधारची खिचडी हॉटेलसमोर थांबलेला होता. यावेळी तिथे अजितसिंग चव्हाण (रा. बायपास रोड), गणेश शिंदे आणि शिवा पाटील (रा. अर्धापूर) हे तिघे जण आले.
यावेळी त्यांनी सूर्यवंशी याला तुझ्या चुलत भावाने माझा मित्र सदाशिव देशमुख याला ठार मारले. तेव्हा तू तुझ्या चुलत भावाला मदत का केली म्हणून वाद घातला. त्यानंतर सूर्यवंशी याच्या दुचाकीला लाथ मारून पाडले. तसेच एका आरोपीने सूर्यवंशी याला पकडून ठेवले तर दुसऱ्याने खंजरने डोक्यावर वार केले. यावेळी सूर्यवंशी याच्या मदतीसाठी आलेल्या मित्रालाही मारहाण करण्यात आली. या प्रकरणात विमानतळ पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा नोंद केला असून तपास सपोनि दोनकलवार हे करीत आहेत.