माॅनिंग वाॅक करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना अज्ञात वाहनाने चिरडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2024 13:30 IST2024-01-12T13:30:16+5:302024-01-12T13:30:39+5:30

दरम्यान अज्ञात वाहन चालकाने आपल्या ताब्यातील वाहन हयगयीने चालवून सदरील दोन्ही विद्यार्थ्यांना धडक दिली.

Two students who were on a manning walk were crushed by an unknown vehicle | माॅनिंग वाॅक करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना अज्ञात वाहनाने चिरडले

माॅनिंग वाॅक करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना अज्ञात वाहनाने चिरडले

भोकर ( नांदेड) : येथील मुंबई - निर्मल राष्ट्रीय महामार्गावर माॅर्निंग वाॅक करणाऱ्या दोन शालेय विद्यार्थ्यांना एका अज्ञात वाहनाने धडक देवून, चिरडल्याची ऱ्हदयद्रावक घटना भोकर ते नांदेड रस्त्यावरील भोसी जवळ शुक्रवारी सकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली आहे. 

यातील मयत संकेत दत्ता पाशेमवाड (वय १७, इयत्ता १० वी. कै. मोहनराव देशमुख विद्यालय भोसी) व वैभव दत्ता येळणे (१८, इयत्ता ११ वी, कै. लक्ष्मणराव घिसेवाड कनिष्ठ महाविद्यालय भोकर) दोघे रा. खरबी ता. भोकर हे नेहमी प्रमाणे गावाजवळील राष्ट्रीय महामार्गावर माॅर्निंगवाॅक, रनींग करीत होते.

दरम्यान अज्ञात वाहन चालकाने आपल्या ताब्यातील वाहन हयगयीने चालवून सदरील दोन्ही विद्यार्थ्यांना धडक दिली. यामध्ये दोन्ही शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. मयत संकेत च्या पश्चात आई, वडील लहान बहिण आहे. कुटुंबातील एकुलता मुलगा गेल्याने, परिवारावर दुःखाचे संकट कोसळले आहे. तर मयत वैभव च्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ आहे. एकाच घटनेत खरबी गावातील दोन होतकरु विद्यार्थी मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली होती. घटनेची माहिती मिळताच भोकर पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. 
 

Web Title: Two students who were on a manning walk were crushed by an unknown vehicle