नांदेडमध्ये आणखी दोन कोरोना बळी; ११ बाधितांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 11:08 IST2020-07-11T11:07:56+5:302020-07-11T11:08:56+5:30

जिल्हयातील एकूण बाधितांची संख्या ५६९ एवढी झाली आहे.

Two more corona deaths in Nanded; Increase of 11 positive patients | नांदेडमध्ये आणखी दोन कोरोना बळी; ११ बाधितांची वाढ

नांदेडमध्ये आणखी दोन कोरोना बळी; ११ बाधितांची वाढ

नांदेड:  भोकर तालुक्यातील एका महिला रुग्णासह नांदेड शहरातील भिमपूरा येथील २८ वर्षीय बाधित तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने जिल्हयातील कोरोना बळींची एकूण संख्या २७ झाली आहे. दरम्यान शनिवारी सकाळी आणखी ११ रुग्ण आढळल्याने जिल्हयातील एकूण बाधितांची संख्या ५६९ एवढी झाली आहे.

भोकर तालुक्यातील गांधी चौक परिसरातील एका ३३ वर्षीय महिलेचा स्वॅब पॉझिटीव्ह आला होता. ३ जुलैपासून या महिलेवर विष्णूपुरी येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यु झाला. तर उपचारासाठी कालच दाखल झालेल्या नांदेड शहरातील एका २८ वर्षीय तरुणाचाही उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

दरम्यान शनिवारी सकाळी प्राप्त झालेल्या अहवालापैकी ११ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. यामध्ये बिलोली तालुक्यातील दोन, भोकर मधील एक, मुदखेड शहर तीन, बाहेगाव तालुका देगलूर येथील एक तर नांदेड येथील चौघांचा समावेश आहे.

Web Title: Two more corona deaths in Nanded; Increase of 11 positive patients