शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

नांदेडमध्ये दोन अल्पवयीन मुलांच्या अपहरणाने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 5:15 PM

या प्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़

नांदेड : नांदेड शहरात मागील दोन दिवसात दोन मुलांचे अपहरण झाले आहे़  जुन्या नांदेडातून इतवारा येथून एका १० वर्षाच्या तर राजेंद्र नगर येथून एका १५ वर्षाच्या मुलाचे अपहरण करण्यात आले आहे़ या प्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़

शहरातील राजेंद्रनगर येथून दिग्विजय गणेश नारागुडे (वय १५) या मुलाचे कोणीतरी अज्ञात कारणासाठी अपहरण केले़ विशेष म्हणजे राजेंद्रनगर येथील त्याच्या घरापासूनच  दिग्विजयचे अपहरण करण्यात आले़  त्याचा शोध घेतला असता तो आढळून आला नाही़  या प्रकरणी मुलाची आई मंगल नारागुडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून विमानतळ ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

दुसरी घटना जुन्या नांदेडातील इतवारा कुंभार टेकडी भागात घडली़ शेख इबाद (१० वर्ष) हा २८ मे रोजी घरासमोरील रस्त्यावर खेळत होता़ त्यावेळी त्याचे अपहरण करण्यात आले़ त्याचाही शोध घेतला, परंतु तो अद्याप सापडला नाही़ या प्रकरणी रफीक पाशा शेख इब्राहीम यांच्या तक्रारीवरून इतवारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे़ 

टॅग्स :KidnappingअपहरणCrime Newsगुन्हेगारीNandedनांदेड