लोहा अन् बारड शिवारातील दोन शेतकऱ्यांनी घेतला गळफास
By शिवराज बिचेवार | Updated: April 3, 2023 17:19 IST2023-04-03T17:19:04+5:302023-04-03T17:19:24+5:30
आर्थिक विंवचनेतून संपवले जीवन

लोहा अन् बारड शिवारातील दोन शेतकऱ्यांनी घेतला गळफास
नांदेड : नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून लोहा आणि बारड शिवारातील दोन शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना १ एप्रिल रोजी घडली.
लोहा तालुक्यातील सेनेगाव येथील मोतीराम तुकाराम येरमुनवाड हा तरुण शेतकरी आर्थिक विंवचनेतून निराश झाला होता. १ एप्रिल रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घरी पत्र्याच्या लाकडाला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत पार्वती येरमुनवाड यांनी पाेलिसांना माहिती दिली, तर बारडवाडी शिवारात रामकिशन वामनराव बागडे यांच्यावर बँकेचे ७० हजार रुपयांचे कर्ज होते. त्यातच अवकाळीमुळे नापिकी झाली होती. त्यांनी शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतला. या प्रकरणात शंकर बागडे यांच्या माहितीवरून पोलिसांनी नोंद केली.