शेतालगतच्या खड्ड्यात पोहताना दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2021 16:20 IST2021-11-26T16:20:05+5:302021-11-26T16:20:33+5:30
शेततळ्यासाठी खड्यात पाणी साचलेले आहे, यात पोहताना झाली दुर्घटना

शेतालगतच्या खड्ड्यात पोहताना दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू
नांदेड : शेततळ्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पोहण्यास केलेल्या दोन चुलत भावांचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज सकाळी देगलूर तालुक्यातील कावळगड्डा येथे घडली. अक्षय रोहिदास राजुरे ( १० ) आणि प्रमोद हनमंत राजुरे ( ११ ) अशी मृतांची नावे आहेत.
कावळगड्डा शिवारात दिलीप पाटील यांचे शेत आहे. त्यांच्या शेताजवळ बंधाऱ्याच्या खालच्या बाजूस शेततळ्यासाठी खोदलेल्या खड्यात पाणी साचलेले आहे. या पाण्यात पोहण्यासाठी आज सकाळी अक्षय आणि प्रमोद यांनी उड्या मारल्या. मात्र, ते वर आलेच नाही. काही वेळाने दोघांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळुन आले.