पोलिसांच्या मारहाणीत आदिवासी तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 05:30 IST2019-03-05T05:30:03+5:302019-03-05T05:30:08+5:30

यवतमाळ जिल्ह्यातील दराटी (ता. उमरखेड) ठाण्यातील पोलिसांनी केलेल्या मारहाणीत तेथून जवळच असलेल्या बोरी येथील आदिवासी युवकाचा मृत्यू झाला.

Tribal youth dies in police custody | पोलिसांच्या मारहाणीत आदिवासी तरुणाचा मृत्यू

पोलिसांच्या मारहाणीत आदिवासी तरुणाचा मृत्यू

किनवट (जि. नांदेड) : यवतमाळ जिल्ह्यातील दराटी (ता. उमरखेड) ठाण्यातील पोलिसांनी केलेल्या मारहाणीत तेथून जवळच असलेल्या बोरी येथील आदिवासी युवकाचा मृत्यू झाला. हे प्रकरण दडपण्यासाठी पोलिसांनी मृतदेह चक्क दुचाकीवरुन आणला आणि नांदेड जिल्ह्यातील गोकुंदा (ता. किनवट) येथील उपजिल्हा रुग्णालयात ठेवून पोबारा केला.
दराटी ठाण्याच्या पोलिसांनी सोमवारी दुपारी अडीच वाजता बोरी (वनग्राम) शिवारात एका जुगार अड्ड्यावर धाड टाकली. या वेळी काही जुगारी पळून गेले मात्र त्याच दरम्यान शेतात जाणाऱ्या बोरी वनग्राम येथील संजय बुरकुले (३५) या विवाहित युवकास जुगार खेळणारा समजून पोलिसांनी बेदम मारहाण केली त्यात तो ठार झाला. मात्र त्यानंतर भंबेरी उडालेल्या पोलिसांनी मृतदेह दुचाकीवर घालून गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात चार वाजता आले. वैद्यकीय अधिकारी डॉ ए आर जुबेरी यांनी मृत घोषित केले.

Web Title: Tribal youth dies in police custody