थरारक ! नांदेडमध्ये भाजपच्या माजी पदाधिकाऱ्यावर गोळीबार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 13:37 IST2021-08-12T13:34:00+5:302021-08-12T13:37:49+5:30
Firing in Nanded : रात्री ९ वाजेच्या सुमारास दुचाकीवरील तिघांनी घरासमोरून केला गोळीबार

थरारक ! नांदेडमध्ये भाजपच्या माजी पदाधिकाऱ्यावर गोळीबार
नांदेड : नांदेडमध्ये भाजपा युवा मोर्चाचा माजी शहराध्यक्षावर बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास गोळीबार करण्यात आल्याची थरारक घटना घडली. प्रसंगावधान राखत तेथून बाजूला होत घरात पळ काढल्याने त्यांच्या जीव बचावला. सोनू कल्याणकर असे माजी शहराध्यक्षाचे नाव आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. ( Firing on Former BJP Yuva Morcha city chairman in Nanded)
सोनू कल्याणकर हे शहरातील श्रीनगर भागातील आपल्या घराच्या गेटमध्ये बसले होते. रात्री ९ वाजेच्या सुमारास दुचाकीवर तिघेजण त्यांच्या घरासमोर आले. यातील दोघांनी खाली उतरत सोनूवर बंदुकीतून गोळ्या झाडल्या. प्रसंगावधान राखत सोनू बाजूला झाला आणि घरामध्ये पळाला. त्यामुळे त्याचा जीव वाचला. अज्ञात हल्लेखोरांनी एकूण 3 गोळ्या झाडल्या. गोळीबाराची ही घटना पूर्व वैमानस्यातून घडली की इतर काही कारण आहे. याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, गोळीबाराच्या घटनेने शहरात दहशत पसरलीये.