शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
2
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
3
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
4
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
5
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
6
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
7
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
8
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
9
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
10
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
11
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
12
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
13
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
14
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
15
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
16
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
17
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
18
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
19
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
20
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती

खंडणी घेण्यास आले, पोलीस असल्याची कुणकुण लागताच आरोपींचा गोळीबार; पोलिसांचेही प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2023 12:05 IST

एक कोटींची खंडणी, सेटलमेंट दोन लाखांवर; आरोपी- पोलिसांचा एकमेकांवर गोळीबार

मारतळा (जि.नांदेड) : एक कोटी रुपयांची खंडणी मागून २ लाखांवर सेटलमेंट झाल्यानंतर खंडणी घेण्यासाठी गेलेल्या आरोपींना सामान्य वेशात पोलिस असल्याची कुणकुण लागताच आरोपींनी पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही आरोपींवर गोळीबार केल्याची खळबळजनक घटना २९ जून रोजी दुपारी १ वाजता नांदेड शहरापासून काही अंतरावर असलेल्या ढाकणी (ता. लोहा) येथे घडली आहे. पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले आहे.

नांदेड शहरानजीक एमआयडीसी परिसरातील ढाकणी हे गाव लोहा तालुक्यात येते. उद्योजक टी. एस. लोहिया यांचे या भागात स्टोन क्रशर आहे. लोहिया यांना काही दिवसांपूर्वी आरोपींनी १ कोटी रुपयांची खंडणी मागितली. त्यानंतर २ लाख रुपयांवर खंडणीखोरांनी सेटलमेंट केले. ही खंडणी घेण्यासाठी गुरुवारी दुपारी साधारणत: १ वाजण्याच्या सुमारास ४ पुरुष व एक महिला कार (क्र.एम.एच.२६/बीएक्स ८७१०) व एम.एच.२६/एपी ५९३८ आणि एम.एच.२६/सीसी ७११३ या क्रमांकाची दुचाकी घेऊन ढाकणी परिसरात असलेल्या स्टोन क्रेशरजवळ आले. खंडणीखोरांनी लोहिया यांच्याशी संपर्क साधला आणि पैशांची मागणी केली. लोहिया यांनी खंडणीची मागणी होत असल्याची माहिती आधीच पोलिसांना दिली होती. त्यामुळे पोलिसांनी या भागात सापळा लावला होता.

पैशांची मागणी झाल्यावर स्टोन क्रशरपासून काही अंतरावर आपली कार (एम.एच.२६/सीई ८८००) उभी केली आहे. त्यात पैसे ठेवले असून, तेथून घेऊन जा, असे लोहिया यांनी सांगितले. मात्र, आरोपींनी तुम्ही पैसे द्या, असा आग्रह धरला. लोहिया यांनी नकार दिल्यानंतर आरोपी स्वत: आणलेली कार घेऊन लोहिया यांच्याकडे कारकडे निघाले. कारमधून उतरत असताना या भागात सामान्य गणवेशातील पोलिस असल्याचे लक्षात येताच, खंडणीखोरांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. आरोपींनी गोळीबार करताच दुसऱ्या बाजूने पोलिसांनीही गोळीबार केला. आधीपासूनच सतर्क असलेल्या पोलिसांनी आरोपींचा पाठलाग करीत एका महिलेसह चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. घटनास्थळ लोहा तालुक्यातील सोनखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत असून, पोलिस निरीक्षक विशाल भोसले यांच्यासह कर्मचारीदेखील घटनास्थळी दाखल झाले होते.

एसपींची घटनास्थळी भेटया घटनेची माहिती समजताच पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलिस अधीक्षक अबिनाशकुमार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुरज गुरव, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी घटनास्थळी भेट दिली.

रिंदाच्या नावाने खंडणीआरोपींनी आंतरराष्ट्रीय दहशतवादी रिंदाचे नाव घेऊन ही खंडणी मागितल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांत भीतीचे वातावरण होते. मात्र, पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतल्याने व्यापाऱ्यांसमोरील दहशत कमी होण्यास मदत होणार आहे. वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेडPoliceपोलिस