धुणे धुवायला गेलेल्या तिघी गोदावरीत बुडाल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 08:51 IST2025-06-08T08:50:56+5:302025-06-08T08:51:30+5:30

Nanded News: गोदावरी नदीपात्रात कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकींसह पुतणीचा पाण्यात बुडून  मृत्यू झाला. ही घटना  तालुक्यातील भायेगाव येथे शनिवारी दुपारी घडली. महानंदा भगवान हणमंते (वय ३५), पायल भगवान हणमंते (१३), ऐश्वर्या मालू हणमंते (१३) अशी मृतांची नावे आहेत.

Three women drowned in Godavari while washing clothes | धुणे धुवायला गेलेल्या तिघी गोदावरीत बुडाल्या

धुणे धुवायला गेलेल्या तिघी गोदावरीत बुडाल्या

उमरी (नांदेड) - गोदावरी नदीपात्रात कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकींसह पुतणीचा पाण्यात बुडून  मृत्यू झाला. ही घटना  तालुक्यातील भायेगाव येथे शनिवारी दुपारी घडली. महानंदा भगवान हणमंते (वय ३५), पायल भगवान हणमंते (१३), ऐश्वर्या मालू हणमंते (१३) अशी मृतांची नावे आहेत.

गावातील बोअरवेलवरील विद्युत मोटर आठ दिवसांपासून जळाल्यामुळे बंद आहे. त्यामुळे महानंदा दोघींना घेऊन कपडे धुण्यासाठी नदीवर गेली होती. कपडे धूत असताना बाजूला पाण्यात खेळत असलेली पायल खड्ड्यात बुडायला लागली. आई महानंदाने तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघीही पाण्यात बुडाल्या. यावेळी ऐश्वर्या या दोघींचा हात धरायला गेली. तर तीही  पाण्यात बुडाली.

तलावात उतरले, दोघांचा बुडून मृत्यू
बार्शीटाकळी (जि. अकोला) : तालुक्यातील बोरमळी शिवारातील तलावात बुडून चिखलगाव येथील दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. योगेश आश्रुबा डहाळे (२०) आणि कार्तिक किसन डहाळे (१९) अशी मृतांची नावे आहेत.मृत दोघेही चिंचोलीतील रुद्रायणी देवीच्या दर्शनासाठी मित्रांसह आले होते. 

Web Title: Three women drowned in Godavari while washing clothes