वाहनाने रस्ता होण्याच्या कारणावरून दोघा भावांना मारहाण करण्यात आली. ही घटना देगलूर तालुक्यातील मौजे पिंपळगाव येथे घडली. अरुण पंढरीनाथ पाटील हे भावासोबत रस्त्याने जात असताना आरोपीने तुमच्या वाहनामुळे रस्ता खराब होत असून, त्याचे पैस का देत नाही, म्हणून त्यांच्याशी वाद घातला. त्यानंतर काठी आणि रॉडने दोघा भावांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणात देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
डाॅक्टर लेनमध्ये अवैध दारू विक्री
शहरातील डॉक्टर लेन परिसरात अवैधपणे दारू विक्री करणाऱ्याला पोलिसांनी पकडले. २४ मे रोजी सायंकाळी ७ वाजता ही कारवाई करण्यात आली. यावेळी आरोपीकडून २ हजार ३०० रुपयांची देशी दारू जप्त करण्यात आली. या प्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.