पाच लाखांसाठी विवाहितेचा छळ
नांदेड : प्लॉट घेण्यासाठी माहेराहून पाच लाख रुपये घेऊन येण्याच्या मागणीसाठी खानापूर येथे विवाहितेचा छळ करण्यात आला. उपाशीपोटी ठेवून विवाहितेला मारहाण करण्यात आली. या प्रकरणात रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. तर उमरी तालुक्यातील बळेगाव येथे कर्ज फेडण्यासाठी विवाहितेला माहेराहून तीन लाख रुपये आणण्याची मागणी करण्यात आली. त्यासाठी घराबाहेर हाकलण्यात आले. या प्रकरणात उमरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
जुगार अड्ड्यावर पोलिसांच्या धाडी
नांदेड : नाळेश्वर ते नांदेड रस्त्यावर वाघी शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड मारली. या वेळी रोख तीन हजार रुपये जप्त करण्यात आले. लिंबगाव पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदविला. तर शिवाजीनगर भागात दातार चौक भाजी मार्केट येथे मिलन डे नावाचा मटका खेळणाऱ्याला पकडले. त्याच्याकडून बाराशे रुपये जप्त केले.