शहरं
Join us  
Trending Stories
1
'निवृत्त व्हा, कुठेही जा...तुम्हाला सोडणार नाही', राहुल गांधींचा थेट इशारा; कुणावर संतापले?
2
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
3
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
4
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
5
पंचायत निवडणुकीत उतरले सोशल मीडिया इन्फ्लुएंसर; लाखो फॉलोअर्स पण पडलेली मते एकदा पाहाच
6
जागतिक अस्थिरता असतानाही सोने-चांदी स्वस्त! गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी? भविष्यात काय होणार?
7
PNB Housing Finance ला मोठा झटका, वरिष्ठांच्या राजीनाम्यानंतर शेअर १६% नं आपटला; लागलं लोअर सर्किट
8
चोर तर चोर वर शिरजोर! दागिन्यांच्या दुकानातून अंगठी चोरली, पोलिसांनी पकडल्यावर गुंडगिरी
9
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
10
Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
11
Video: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी अवतरली मराठी सिनेसृष्टी, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना
12
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; IPBS ची १०,२७७ पदांवर मेगाभरती, महाराष्ट्रासाठी किती जागा?
13
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
14
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
15
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
16
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
17
अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...
18
"मला कोंडून ठेवलं, पत्नीला दुखापत..."; आमदार चेतन आनंद यांचे एम्स कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप
19
जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू

विकासापासून कोसो दूर तुराटी आले प्रकाशझोतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 23:58 IST

विकासापासून कोसोदूर असलेल्या तुराटी या गावातील पोतन्ना बलपीलवाड या ६० वर्षीय वृद्ध शेतक-याने कर्ज व नापिकीमुळे कंटाळून केलेल्या आत्मदहनानंतर गेली कित्येक वर्षे तुराटी गावाचे तोंडही न पाहिलेल्या राजकारणी व अधिका-यांनी आज या गावाकडे एकच गर्दी केली़ आपद्ग्रस्त शेतक-यांच्या वारसांना मदतीचा ओघ सुरू झाला आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्याची सरण रचून आत्महत्यासंतप्त ग्रामस्थांनी अधिकाºयांना धरले धारेवर

उमरी : विकासापासून कोसोदूर असलेल्या तुराटी या गावातील पोतन्ना बलपीलवाड या ६० वर्षीय वृद्ध शेतक-याने कर्ज व नापिकीमुळे कंटाळून केलेल्या आत्मदहनानंतर गेली कित्येक वर्षे तुराटी गावाचे तोंडही न पाहिलेल्या राजकारणी व अधिका-यांनी आज या गावाकडे एकच गर्दी केली़ आपद्ग्रस्त शेतक-यांच्या वारसांना मदतीचा ओघ सुरू झाला आहे.भाऊबीजेच्या दिवशी पोतन्ना बलपीलवाड या शेतक-याने शेतामध्ये स्वत:चे सरण रचून आत्मदहन केले. बँकेचे कर्ज व सततची नापिकी या नैराश्यातून झालेल्या आत्मदहनाच्या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली. नांदेड जिल्ह्यातील तुराटी या तेलंगणा राज्याच्या सीमेवरील गावाला रस्ते, सिंचन, आरोग्य, शिक्षण अशा अनेक सुविधांची वानवा आहे. वर्षानुवर्षे मागणी करूनही या गावाकडे कुणीही लक्ष देत नाही. हादरवून सोडणाºया शेतकºयाच्या या आत्मदहनानंतर मात्र सर्वच यंत्रणा खडबडून जागी झाली.रविवारी आमदारांसह विविध पक्षांचे पदाधिकारी, पोलीस अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आदींनी येथे भेटी दिल्या. महाराष्ट्रात असूनही आजवर आमच्या गावाकडे हे अधिकारी व राजकारणी यांनी भेट दिली नाही. आमचे प्रश्न जाणून घेतले नाहीत. याबाबत ग्रामस्थांनी त्यांना धारेवर धरले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़ अशोक चव्हाण यांच्या वतीने विधान परिषदेचे सदस्य आ़ अमर राजूरकर यांनी यावेळी पक्षाच्या वतीने पन्नास हजार रुपये आत्महत्याग्रस्त शेतक-याच्या कुटुंबीयांना रोख स्वरूपात दिले. आ़ वसंतराव चव्हाण यांनी या कुटुंबाला शासनातर्फे मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. भारतीय प्रजासत्ताक पार्टीच्या वतीने पंकज शिवभगत यांनी सदर शेतक-याच्या शेतामध्ये पाणी लागेपर्यंत बोअर पाडून येत्या दहा दिवसांत विद्युत मोटार बसवून देण्याचे आश्वासन दिले.तर राष्ट्रवादीचे उमरी तालुका अध्यक्ष व व्हीपीके उद्योगसमूहाचे मारोतराव कवळे यांनी पाच हजार रुपयांची रोख स्वरूपात मदत दिली़ तसेच मयत शेतक-याच्या नातवांचा शिक्षणाचा खर्च पतसंस्थेच्या वतीने करण्याचे आश्वासन दिले. यावेळी भाजपाचे राजेश पवार यांनी २१ हजारांची मदत या कुटुंबीयास दिली. गोला समाज नांदेड जिल्ह्याच्या वतीने प्रांताध्यक्ष नामदेवराव आईनवाड यांच्या वतीने अकरा हजार रुपयांचा धनादेश दिला.याप्रसंगी सहायक पोलीस अधीक्षक नुरुल हसन, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, पंचायत समितीचे सभापती शिरीषराव देशमुख गोरठेकर, तहसीलदार श्रीकांत गायकवाड, गटविकास अधिकारी अमोलकुमार आंदेलवाड, तालुका कृषी अधिकारी एस.एन. पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते गणेशराव पाटील कौडगावकर, दिगंबर सावंत, मधुसूदन चव्हाण, संदीप गोवंदे, बाबूराव शिंदे, पोलीस निरीक्षक अभिमन्यू साळुंके, उपनिरीक्षक सुदर्शन सुर्वे, सरपंच दिलीपराव सावंत, लक्ष्मणराव सावंत, मुकुंदराव पाटील, पोलीस पाटील बाबूराव जोंधळे, गणेशराव आनेमवाड, भोजराज पाटील, मनोज पाटील जामगावकर आदींची यावेळी उपस्थिती होती.

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्या