शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

उमरीत पिसाळलेल्या वानराची दहशत; प्रशिक्षण बंद, बंदोबस्तासाठी आलेला वन कर्मचारी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 19:20 IST

एका वानरामुळे ७५ शिक्षकांचे प्रशिक्षण अर्ध्यावर बंद पडले, प्रशिक्षण नांदेडला हलवावे लागले आहे

उमरी (नांदेड) : उमरी तालुक्यात एक पिसाळलेला वानर चक्क प्रशासन आणि वनविभागाच्या यंत्रणेलाही सळो की पळो करून सोडतो आहे. एका वानरामुळे ७५ शिक्षकांचे प्रशिक्षण अर्ध्यावर बंद पडले, प्रशिक्षण नांदेडला हलवावे लागले, तर बंदोबस्तासाठी आलेल्या वन कर्मचाऱ्यावरच वानराने चावा घेतला. या घटनांमुळे उमरी शहरात भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

९ जुलै रोजी उमरी येथील तहसील कार्यालयातील सभागृहात बाललैंगिक शिक्षण या विषयावर शिक्षकांचे सहा दिवसांचे प्रशिक्षण सुरू होते. मुंबई येथून आलेल्या तीन प्रशिक्षकांपैकी एका ट्रेनरवर व त्याच्या वाहनचालकावर वानराने अचानक हल्ला केला. वाहनचालकाला चावा घेतल्याने दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उमरीच्या ग्रामीण रुग्णालयात रेबीजच्या लसी उपलब्ध नसल्याने त्यांना नांदेडला हलवावे लागले. त्यामुळे पुढील सर्व प्रशिक्षण नांदेड येथे घेण्यात आले, आणि ७५ शिक्षकांचा वेळ आणि प्रवास दोन्ही वाया गेला.

याच दरम्यान वानराने संत दासगणू आश्रमशाळेजवळही उच्छाद मांडला. विद्यार्थ्यांच्या खोल्यांबाहेर धिंगाणा घालून त्यांना भयभीत केले. ही बाब वनविभागाच्या लक्षात आली, पण त्यांच्याकडून प्रत्यक्ष कारवाई करण्याऐवजी केवळ दोन वॉचमनना पाठवून विषय हाताळण्याचा प्रयत्न झाला. शनिवारी सायंकाळी ही निष्काळजीपणाची किंमत वनकर्मचारी शाहूजी शिंदे यांना चुकवावी लागली. वानराला झुडपांतून हुसकावण्याचा प्रयत्न करत असताना वानराने त्यांच्या चेहऱ्यावर, डोळ्याजवळ चावा घेतला. रक्तबंबाळ अवस्थेत शिंदे यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. शाळेतील विद्यार्थी आणि कर्मचारीही या घटनेने हादरले.

या वानराच्या उपद्रवामुळे उमरी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिक आणि कर्मचारी जीव मुठीत धरून काम करत आहेत. वनविभागाकडून अद्यापही पिसाळलेल्या वानराच्या कायमस्वरूपी बंदोबस्तासाठी आवश्यक ती साधने, प्रशिक्षित कर्मचारी किंवा प्रभावी कारवाई दिसून येत नाही. नागरिकांतून आता एकच मागणी होत आहे "या वानराचा कायमस्वरूपी बंदोबस्त करा, अन्यथा आणखी एखादा मोठा अनर्थ घडू शकतो."

टॅग्स :MonkeyमाकडNandedनांदेडforestजंगल