टेम्पो- बाईकच्या समोरासमोर धडकते एकजण ठार, दोघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2022 16:09 IST2022-03-16T16:09:03+5:302022-03-16T16:09:20+5:30
तिघेजण एकाच बाईकवरून प्रवास करत होते

टेम्पो- बाईकच्या समोरासमोर धडकते एकजण ठार, दोघे जखमी
मुखेड ( नांदेड ) : तालुक्यातील जांब (बु.) जवळ शिरुर ताजबंद रोडवर टेम्पो आणि बाईकची समोरासमोर धडक होऊन एकजण ठार झाल्याची घटना आज दुपारी १२. ३० वाजेच्या दरम्यान झाली. डिगांबर राजगिरवाड असे मृताचे नाव आहे. तर या अपघातात दोघेजण गंभीर जखमी आहेत.
जळकोट तालुक्यातील चेरा येथील परमेश्वर डिगांबर कावलवाड (३२) , डिगांबर राम राजगिरवाड (३४) व सुधाकर आशोक पोकलवाड (३०, रा.आटकळी ता.बिलोली) हे तिघे एकाच बाईकवरून (एम.एच.२६ ए.झेड ०२१७ ) आज दुपारी जांब बु. येथे जात होते. दरम्यान, शिरुर ताजबंद रोडवर जळकोटकडून येणाऱ्या टेम्पो ( क्रमांक एम.एच.२४ ए.बी.५४२४ ) सोबत बाईकची समोरासमोर धडक झाली.
यात बाईकवरील तिघे गंभीर जखमी झाले. ग्रामस्थांनी जखमींनी उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर डिगांबर राजगिरवाड व परमेश्वर कावलवाड यांना गंभीर दुखापत असल्यामुळे जळकोट येथे रवाना केले. जळकोट येथे पोहताच मात्र, डिगांबर यास डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
माहिती मिळताच पोलिस निरिक्षक विलास गोबाडे,पोलिस जमादार डी.एन.गित्ते,शिवाजी आडबे, मारोती मेकलेवाड, योगेश कोकणे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.