शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
2
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
3
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
4
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
5
"ये तो होना ही था..." अरविंदर सिंग लवलींच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
6
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
7
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
8
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
9
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
10
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
11
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
14
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
15
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
16
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
17
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
18
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
19
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
20
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा

तेलंगणा समावेशाचे लोण आता किनवटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 12:39 AM

धर्माबाद तालुक्यातील ३२ गावांनी तेलंगणात समावेश करण्याची मागणी केल्यानंतर खळबळ उडाली होती़ त्यानंतर हिमायतनगर आणि बिलोली तालुक्यांतीलही काही गावांनी अशीच मागणी केली होती़ त्यात आता हे लोण किनवट तालुक्यातही पोहोचले आहे़ किनवटच्या अप्पारावपेठच्या ग्रामस्थांनी तेलंगणात समावेश करण्याची मागणी केली आहे़ त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे़

ठळक मुद्देअप्पारावपेठच्या ग्रामस्थांचीही मागणी, अर्धा कि.मी. अंतरावर तेलंगणा

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : धर्माबाद तालुक्यातील ३२ गावांनी तेलंगणात समावेश करण्याची मागणी केल्यानंतर खळबळ उडाली होती़ त्यानंतर हिमायतनगर आणि बिलोली तालुक्यांतीलही काही गावांनी अशीच मागणी केली होती़ त्यात आता हे लोण किनवट तालुक्यातही पोहोचले आहे़ किनवटच्या अप्पारावपेठच्या ग्रामस्थांनी तेलंगणात समावेश करण्याची मागणी केली आहे़ त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे़धर्माबाद तालुक्याने तेलंगणा समावेशाची मागणी केल्यानंतर प्रशासन आणि राज्यकर्त्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती़ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या मागणीची दखल घेत सरपंच संघटनेला चर्चेसाठी ‘मातोश्री’वर बोलावले होते़त्यानंतर पालकमंत्री रामदास कदम यांच्या उपस्थितीत काही दिवसांपूर्वीच मंत्रालयात धर्माबादच्या मागण्यांवर बैठक घेण्यात आली़ त्यानंतर धर्माबादसाठी ४० कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले़ त्यात बिलोली आणि हिमायतनगर तालुक्यांतील अनेक गावांनी तशाच प्रकारची मागणी केली़ त्यामध्ये आता किनवट तालुक्यातील अप्पारावपेठ या गावाची भर पडली आहे़ अप्पारावपेठ ग्रामपंचायतने जिल्हाधिकाºयांना निवेदन देवून गावाचा तेलंगणात समावेश करण्याची मागणी केली आहे़अप्पारावपेठ हे गाव महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवर आहे़ महाराष्ट्राच्या निर्मितीपूर्वी हे गाव तेलंगणातील बोथ तालुक्यात होते़ अप्पारावपेठ येथील बहुतांश नागरिक तेलगू भाषिक आहेत़ ग्रामस्थांचे व्यवहारही तेलंगणाशी आहेत़ किनवटपासून ७५ किमी अंतरावर असल्यामुळे फक्त शासकीय कामासाठीच ग्रामस्थांना किनवटला यावे लागते़ तर जिल्ह्याच्या ठिकाणी येण्यासाठी सव्वाशे किमीचे अंतर पार करावे लागते़ गावात कुठल्याच सोयीसुविधा नाहीत़ अधिकारीही फिरकत नाहीत़पाच हजारांवर लोकसंख्या असलेल्या या गावापासून अर्धा किलोमीटरवर तेलंगणा आहे़ त्यामुळे अप्पारावपेठचा तेलंगणात समावेश केल्यास या गावचा विकास होईल असेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे़ याबाबत सरपंच सुनीता लोकावार, तंटामुक्तीचे अध्यक्ष विनायक देशमुख, जि़प़सदस्य सूर्यकांत आरडकर, अ‍ॅड़एक़ामारेड्डी, भोजारेड्डी नुतूल, भुमेश किनी, प्रभाकररेड्डी, फारुख शेख, शेख अजीम यांच्यासह जवळपास दोनशे नागरिकांच्या स्वाक्षºयांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले आहे़

टॅग्स :NandedनांदेडTelanganaतेलंगणाNanded collector officeजिल्हाधिकारी कार्यालय नांदेड