शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

शेतकऱ्याकडून घेतली लाच, एसीबीच्या जाळ्यात अडकताच महिला तलाठ्यांना रडू कोसळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 20:16 IST

लाचखोर महिला तलाठ्यांची पोलिस कोठडीत रवानगी, महसूल कार्यालयात धास्तीचे वातावरण

नांदेड : शेतीचा फेर नावे करून देण्यासाठी संगनमत करून अर्जदाराकडून १६ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या महिला तलाठ्यांच्या जोडगोळीला रंगेहाथ पकडल्यानंतर त्यांची रवानगी पोलिस कोठडीत झाली आहे. दरम्यान, एकाच दिवशी महसूलचे दोन कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकल्याने खाबूगिरी करणारे महसुलातील अधिकारी, कर्मचारी चांगलेच धास्तावले आहेत. 

बदली झाल्यावरही जुन्या प्रलंबित प्रकरणाला कॅश करण्याच्या उद्देशाने तलाठी भाग्यश्री भीमराव तेलंगे व सुजाता शंकर गवळे या दोघींनी तयारी चालविली होती. मात्र अर्ज करूनही नियमानुसार असलेले काम करण्यासाठी होत असलेली पैशांची मागणी अर्जदारास मान्य नव्हती. भ्रष्टाचाऱ्यांना धडा शिकवण्याच्या उद्देशाने तक्रारदाराने एसीबी कार्यालय गाठून तक्रार नोंदवली. त्याची खात्री पटताच ३ जून रोजी गोकुंदा (ता. किनवट) येथे सापळा रचला. यावेळी तक्रारदाराने कामासाठी येत असल्याचे सांगितल्याने दोन्ही महिला तलाठ्यांनी पैसे घेण्याचे नियोजन केले. दरम्यान, एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशानुसार अर्जदाराने व्यवहारासाठी ठरलेली रक्कम चर्चा करून तलाठी गवळे यांना दिली. ती स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पथकाने दोन्ही महिला तलाठ्यांना ताब्यात घेतले. लाच प्रकरणात फसल्याचे लक्षात येताच, दोघींनाही रडू कोसळले. याप्रकरणी किनवट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींना ४ जून रोजी न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

धास्ती अन् दबक्या आवाजात चर्चाकिनवट तालुका जिल्ह्यापासून दूर व आदिवासीबहुल असल्याने गौण खनिज, समृद्ध वनसंपदा आहे. या माध्यमातून चंगळ करण्यासाठी अनेकजण येथे पोस्टिंग घेतात. महसूल कार्यालयात तर पैसे दिल्याशिवाय कोणाचेच काम करायचे नाही, असा शिरस्ता असल्याचे नागरिक खुलेआम बोलतात. लोकसेवकांच्या खादाड वृत्तीला कंटाळलेल्या एका शेतकऱ्याने त्यांना चांगली अद्दल घडविली. एकाच दिवशी महसूलच्या दोन महिला तलाठी लाच घेताना रंगेहाथ पकडल्या गेल्या अन् त्यांची रवानगी पोलिस कोठडीत झाली. या प्रकारामुळे किनवट तहसीलसह शहरातील सर्वच शासकीय कार्यालयांत बुधवारी सामसुम पाहायला मिळाली. कारवाईची धास्ती अन् दबक्या आवाजात चर्चा होत असल्याचे चित्र येथे पहावयास मिळाले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेडAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागFarmerशेतकरी