शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णांची सर्वोतोपरी काळजी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:17 IST

कोरोनाच्या वाढत्या महामारीच्या पार्श्वभूमीवर अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष आ.मोहन हंबर्डे यांच्या अध्यक्षतेखाली व महापौर मोहिनीताई येवनकर, अधिष्ठाता डॉ. ...

कोरोनाच्या वाढत्या महामारीच्या पार्श्वभूमीवर अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष आ.मोहन हंबर्डे यांच्या अध्यक्षतेखाली व महापौर मोहिनीताई येवनकर, अधिष्ठाता डॉ. दिलीप म्हैसेकर, सदस्य संतोष पांडागळे, डॉ.करुणा जमदाडे, नगरसेवक संदीप सोनकांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत वैद्यकीय महाविद्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. तत्पूर्वी अभ्यागत मंडळाचे पदाधिकारी व महापौर यांनी कोविड रुग्णकक्ष, स्वयंपाक घर, ऑक्सिजन टँक आदी ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देवून पाहणी केली. पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नामुळे मराठवाड्यातील सर्वात मोठा २० के.एल.ऑक्सिजन टँक वैद्यकीय महाविद्यालयात बसविण्यात येत आहे. चव्हाण यांनी डी.पी.डी.सी. व राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे या अडचणीच्या काळात वैद्यकीय व्यवसायात काम करणाऱ्या सर्व कर्मचारी व अधिकार्‍यांनी आपली जबाबदारी ओळखून रुग्णांची सेवा करावी, असेही आ.मोहन हंबर्डे व महापौर येवनकर यांनी सांगितले. अभ्यागत मंडळाचे सदस्य संतोष पांडागळे व डॉ.करुणा जमदाडे यांनीही रुग्णसेवेसाठी कांही महत्वपूर्ण सूचना केल्या. ही बैठक तब्बल दोन तास चालली.