कौठा (जि. नांदेड) : कंधार तालुक्यातील कौठा येथील ऋषिकेश रामकिशन पालिमकर यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत देशात २८३ वा रँक पटकावून प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न साकारले आहे.
ऋषिकेश यांचे वडील रामकिशन पालीमकर हे गोविंदराव पाटील माध्यमिक विद्यालय चिखली (ता. कंधार) येथे प्राध्यापक तर आई नायगाव तालुक्यातील मांजरम येथे शिक्षिका आहे. ऋषिकेश पालीमकर यांचे प्राथमिक शिक्षण मुखेड शहरातील गुरुदेव विद्यालयात तर माध्यमिक शिक्षण हे नांदेड येथे झाले. ऋषिकेश यांनी हैदराबाद, दिल्ली येथे यूपीएससीची तयारी केली. अभ्यासातील सातत्य, चिकाटी, शिस्तबद्ध दिनचर्या आणि स्पष्ट ध्येय यामुळे त्यांनी हे यश मिळविले. ऋषिकेश कौठा गावातील पहिलेच यूपीएससी अधिकारी ठरले आहेत. शुक्रवारी निकाल जाहीर झाल्यानंतर गावकऱ्यांनी गुलालाची उधळण करत ऋषिकेशच्या यशाचा जल्लोष साजरा केला.
अभ्यासातील सातत्य हेच यशाचे गमक रात्रंदिवस अभ्यास केल्यामुळे मला हे यश प्राप्त करता आले. ग्रामीण भागातील तरुणांनी अभ्यासाला घाबरून न जाता स्पर्धा परीक्षांकडे वळावे. - ऋषीकेश पालिमकर, कौठा ता. कंधार
Web Summary : Rishikesh Palimkar from Koutha, Nanded, secured 283rd rank in UPSC, realizing his dream of becoming an administrative officer. His success, driven by consistent study and dedication, marks him as Koutha's first UPSC officer, sparking joyous celebrations in his village.
Web Summary : नांदेड के कौठा के ऋषिकेश पालिमकर ने यूपीएससी में 283 वां रैंक हासिल कर प्रशासनिक अधिकारी बनने का सपना साकार किया। उनकी सफलता, निरंतर अध्ययन और समर्पण का परिणाम है, जिसने उन्हें कौठा का पहला यूपीएससी अधिकारी बनाया, जिससे गांव में खुशी का माहौल है।