३७८ पाॅलिटेक्निक महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:22 AM2021-08-13T04:22:29+5:302021-08-13T04:22:29+5:30

चाैकट... औद्याेगिक क्षेत्राशी करार प्राचार्य पवार यांनी सांगितले की, तंत्रशिक्षण संचालक डाॅ. अभय वाघ यांनी औद्याेगिक क्षेत्राशी करार केला ...

Students waiting for 378 polytechnic colleges | ३७८ पाॅलिटेक्निक महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची प्रतीक्षा

३७८ पाॅलिटेक्निक महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची प्रतीक्षा

googlenewsNext

चाैकट...

औद्याेगिक क्षेत्राशी करार

प्राचार्य पवार यांनी सांगितले की, तंत्रशिक्षण संचालक डाॅ. अभय वाघ यांनी औद्याेगिक क्षेत्राशी करार केला आहे. त्यामुळे पाॅलिटेक्निकमधून पदविका घेऊन बाहेर पडताच त्या विद्यार्थ्याला जाॅब उपलब्ध करून देण्यावर भर आहे. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वाधार याेजना असून निवास, भाेजन खर्च शासन करणार आहे. त्यांचे ४८ हजार शुल्कसुद्धा शासन भरणार आहे. व्हीजेएनटी, ओबीसी, एसबीसी यांच्यासाठीही सवलतीच्या याेजना आहेत.

चाैकट...

औद्याेगिक अभ्यासक्रमाला अधिक मागणी

औद्याेगिक अभ्यासक्रमाला प्रचंड मागणी आहे, अनेक कंपन्या पदविकाधारकांनाच प्राधान्य देत आहेत, बहुराष्ट्रीय कंपन्याही त्यांचीच मागणी करीत आहेत. ते पाहता विद्यार्थ्यांनी पाॅलिटेक्निक, अभियांत्रिकी महाविद्यालयांकडे वळणे त्यांच्या भविष्यातील नाेकरीच्या संधी लक्षात घेता सर्वाधिक फायद्याचे ठरेल, असेही प्राचार्य विजय पवार यांनी स्पष्ट केले.

Web Title: Students waiting for 378 polytechnic colleges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.