शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

'स्वारातीम' विद्यापीठाचा अजब कारभार, परीक्षेच्या दिवशी केंद्रावर देणार प्रवेश पत्र, परीक्षार्थीत संभ्रम

By श्रीनिवास भोसले | Updated: December 10, 2024 13:22 IST

परीक्षा विभाग म्हणते, परीक्षेपासून कोणीही वंचित राहणार नाही

नांदेड : स्वारातीम विद्यापीठाच्या १० डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षार्थ्यांना अद्याप प्रवेश पत्र प्राप्त झाले नाही. त्यामुळे विद्यार्थीपरीक्षा कशी देणार? असा सवाल उपस्थित केला जात असताना परीक्षा विभागाने मात्र ऐन परीक्षेच्या दिवशी परीक्षा केंद्रावर प्रवेश पत्र दिले जातील, असा अजब फंडा अवलंबिला आहे. परीक्षा केंद्र, परीक्षा क्रमांक आदींची जुळवाजुळव करताना कोणी विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिल्यास जबाबदार कोण? असा सवालदेखील या निमित्ताने उपस्थित होत आहे.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कार्यक्षेत्र नांदेडसह हिंगोली, परभणी आणि लातूर या चार जिल्ह्यात आहे. हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविणाऱ्या विद्यापीठाचा परीक्षा विभाग मात्र नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असतो. मंगळवारी (दि.१०)पासून पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षांना सुरूवात होत आहे. यामध्ये एम. ए., बी. ए., बी. काॅम., बी.एसस्सी., एम. कॉम., एम.एसस्सी आदींच्या परीक्षा तसेच बहिस्थ: विभाग आणि बॅकलॉग आणि रेग्युलर विषयाच्या परीक्षांचा समावेश आहे. बहुतांश विद्यार्थ्यांपर्यंत हॉल तिकीटच पोहोचले नाही. त्यामुळे ऐनवेळी महाविद्यालयाच्या ओळखपत्र पाहून परीक्षेस बसू द्यावेत, अशा सूचना संबंधित प्राचार्य आणि परीक्षा केंद्रप्रमुखांना विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने दिल्या आहेत. मात्र, ऐनवेळी विना हॉल तिकीट परीक्षा घेण्याची नामुष्की विद्यापीठावर का ओढावली, परीक्षा विभागाच्या या सावळ्या गोंधळाला कोण जबाबदार? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

परीक्षार्थ्यांची मानसिकतेचे काय?विद्यापीठाने नेमून दिलेल्या परीक्षा केंद्रावर जायचे, पण परीक्षेसाठी असणारा आसन क्रमांक नाही, कोणत्या विषयाचा पेपर ते माहीत नाही. ऐनवेळी परीक्षा केंद्र हॉल अन् आसन क्रमांक दिला जाणार, अशा संभ्रमावस्थेत गोंधळलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता राहणार का? असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

परीक्षा विभागा गोंधळलापरीक्षा विभाग आणि एमकेसीएल यांच्या संयुक्त विद्यमाने परीक्षेचे आयोजन केले जाते. प्राचार्यांच्या लॉगिनमधून विद्यार्थ्यांना हॉल तिकीट केले जाते. परंतु, परीक्षा विभागाने सदर आवेदनपत्र तथा हॉल तिकीट प्राचार्यांच्या लॉगीनमध्ये अपलोड केले गेले नाहीत. त्यामुळे गोंधळलेल्या परीक्षा विभागाने ऐनवेळी महाविद्यालयाच्या ओळखपत्रावर परीक्षा घेण्याच्या लेखी सूचना संबंधित प्राचार्य आणि परीक्षा केंद्रचालकांना दिल्या आहेत.

काय म्हणतात परीक्षा विभागाचे संचालक...विद्यापीठाच्या हिवाळी-२०२४ पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी परीक्षा आवेदनपत्र सादर करूनही ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा प्रवेशपत्र अद्याप प्राप्त झालेले नाहीत, अशा विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्याचे परीक्षा विभागाचे शर्तीचे प्रयत्न चालू आहेत. कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही. ओळखपत्र पाहून विद्यार्थ्याची परीक्षा घेण्याचे अधिकार परीक्षा विभागाने परीक्षा केंद्रांना दिलेले आहेत.- हुशारसिंग साबळे, संचालक - परीक्षा व मूल्यमापन विभाग, स्वारातीम विद्यापीठ, नांदेड.

टॅग्स :swami ramanand tirth marathawada univercity, nandedस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडEducationशिक्षणexamपरीक्षाStudentविद्यार्थी