शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
2
तुम्ही बिनशर्त पाठिंबा सगळं गुजरातला देण्यासाठी दिलाय का? आदित्य ठाकरेंचा मनसैनिकांना खोचक टोला
3
अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार; आज दिल्लीत घेणार जाहीर सभा
4
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक
5
Baba Ramdev Patanjali Foods : बाबा रामदेव यांच्या कंपनीला मोठा झटका, मार्च तिमाहीत २२ टक्क्यांनी घसरला नफा 
6
17000 राजकारणी, अब्जाधीशांनी देश बुडविला; पाकिस्तानींनी दुबईत घेतली तब्बल 23000 घरे
7
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
8
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
10
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
11
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
12
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
14
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
15
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
16
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
17
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
18
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
19
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
20
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार

काँग्रेस कार्यकर्त्यांनो, कामाला लागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2019 1:19 AM

भोकर हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून संपूर्ण राज्यात ओळखल्या जातो. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्यापासून या मतदारसंघाने नेहमीच काँग्रेस पक्षाला समर्थ साथ दिली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात विविध ठिकाणी बैठकाविधानसभेच्या तयारीसाठी अशोकराव चव्हाण यांनी कार्यकर्त्यांत पेरला उत्साह

नांदेड : भोकर हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून संपूर्ण राज्यात ओळखल्या जातो. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्यापासून या मतदारसंघाने नेहमीच काँग्रेस पक्षाला समर्थ साथ दिली आहे. परंतु, लोकसभा निवडणुकीत नेमके काय झाले? याचे चिंतन कराव लागेल. मात्र एका निवडणुकीवरून सर्व काही ठरविल्या जात नाही. लोकसभा निवडणूक आपल्यासाठी एक अपघात होता असे समजून झाले गेले विसरून जा, व येणाऱ्या विधानसभा निवडणुका जिंकायच्याच म्हणून ताकदीने कामाला लागा असे आवाहन प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी केले.अशोकराव चव्हाण यांनी बुधवारी रमजान ईदनिमित्त नांदेड जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी नांदेडसह मुदखेड, भोकर, अर्धापूर आदी ठिकाणी भेटी दिल्या. ईदनिमित्त त्यांनी अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांच्या घरी जावून त्यांनाही शुभेच्छा दिल्या. त्यानंतर भोकर येथील शासकीय विश्रामगृहावर तालुक्यातील विविध गावचे सरपंच व प्रमुख पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला भोकर तालुक्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.ते म्हणाले, भोकर तालुक्यात आपण मोठ्या प्रमाणात निधी आणला. ज्यामुळे तालुक्यात रस्त्याचे जाळे उत्तम प्रकारे विणल्या गेले आहे. उर्वरित रस्त्यांसाठीसुद्धा भविष्यात मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणू. भोकर तालुक्यात पिण्याच्या पाण्याची परिस्थिती दरवर्षी बिकट बनते. या भागात अनेक सिंचन प्रकल्प निर्माण करण्यासाठी आपला सातत्यपूर्ण पाठपुरावा आहे. या भागात लघु व सूक्ष्म सिंचन प्रकल्प मोठ्या प्रमाणात निर्माण केले आहेत. नाला सरळीकरण व कोल्हापुरी बंधाºयांची अनेक कामे पूर्णत्त्वास गेली आहेत. लोकसभा निवडणुकीत आपला पराभव झाला; पण या पराभवाने काँग्रेस कार्यकर्त्यांनी खचून जावू नये. आपण कुठे कमी पडलो याचे प्रत्येकाने चिंतन करावे. विधानसभा निवडणुका आता जवळ आल्या आहेत. आपापल्या गावात काँग्रेस पक्षाला जास्तीचे मताधिक्य कसे मिळवून देता येईल, याअनुषंगाने नियोजन करा. मी तुमच्यासोबत तुम्ही माझ्यासोबत रहा. येणा-या निवडणुकीत काँग्रेस पक्ष नक्कीच पुन्हा एकदा उभारी घेतलेला दिसेल , असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.काँग्रेस पक्षाला मोठी परंपरा आहे. या पक्षाने काही वेळेस पराभवाचा सामनाही केला. मात्र त्यानंतरही पुन्हा पक्षाने नव्याने उभारी घेतल्याचा इतिहास आहे. त्यामुळे एका पराभवामुळे खचून जाण्याचा, निराश होण्याची आवश्यकता नाही. मात्र लोकसभा निवडणुकीत ज्या चुका झाल्या, त्या चुका पुन्हा होणार नाहीत, याची दक्षता घेऊन पुन्हा कामाला लागूू. आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील जनता पुन्हा काँग्रेसच्या पाठीशी राहील, असा विश्वासही अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केला. शासकीय विश्रामगृहावर ताटकळवाडी, समंदरवाडी, मोघाळी, किनी, थेरबन, रिट्टा, बेंबर, हस्सापूर, भोसी व पिंपळढव जि. प. सर्कलमधील अनेक गावांचे सरपंच, चेअरमन व काँग्रेस कार्यकर्त्यांनी अशोकराव चव्हाण यांची भेट घेवून त्यांच्याशी चर्चा केली. तत्पूर्वी भोकर शहरातील युसूफभाई, रमीज ईनामदार, मियॉ मामू, आयुब मांजरमकर, माजीद लाला यांच्या निवासस्थानी रमजान ईदनिमित्त त्यांनी भेटी दिल्या. यावेळी काँग्रेसचे सर्व प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यकर्ता हीच पक्षाची ताकदच्नांदेड जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्त्यांचे अभेद्य नेटवर्क आहे. सर्वसामान्य कार्यकर्ता हीच काँग्रेसची ताकद असल्याचे सांगत काँग्रेसने कायमच कार्यकर्त्यांना सन्मान देण्याचे काम केले आहे. यापुढील काळातही या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जिल्ह्यातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करु, असे सांगत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे ते म्हणाले. निवडणुकीच्या अनुषंगाने लवकरच विधानसभानिहाय नियोजन करु, असेही अशोकराव चव्हाण यांनी सांगितले.

टॅग्स :NandedनांदेडAshok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेस