सोनू कल्याणकर हत्या प्रकरण: तीन अल्पवयीन अटकेनंतर चौथ्या आरोपीशी पोलिसांची चकमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 16:40 IST2026-04-06T16:40:04+5:302026-04-06T16:40:37+5:30

सोनू कल्याणकर हत्येतील आरोपीला पोलिसांनी गोळी झाडून पकडले; नांदेडच्या झरी शिवारात चकमकीचा थरार.

Sonu Kalyankar murder case: After arresting three minors, police encounter fourth accused; four arrested | सोनू कल्याणकर हत्या प्रकरण: तीन अल्पवयीन अटकेनंतर चौथ्या आरोपीशी पोलिसांची चकमक

सोनू कल्याणकर हत्या प्रकरण: तीन अल्पवयीन अटकेनंतर चौथ्या आरोपीशी पोलिसांची चकमक

नांदेड: शिवसेना शिंदे गटाचे युवा शहर प्रमुख सोनू कल्याणकर यांच्या हत्येने हादरलेल्या नांदेडमध्ये आज दुपारी पोलिसांनी अत्यंत धाडसी कारवाई केली. हत्येनंतर फरार असलेला मुख्य आरोपी अंकुश गंदमवार याला झरी शिवारात पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर त्याने गोळीबार केला. प्रत्युत्तरात स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात आरोपी जखमी झाला असून, त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

थरारक पाठलाग आणि चकमक
सोमवारी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या सोनू कल्याणकर यांची भररस्त्यात १७ वार करून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत तीन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले. मात्र, चौथा आरोपी अंकुश गंदमवार हा झरी शिवारात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच अंकुशने पळ काढण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला.

पोलिसांचा जशास तसा जवाब
स्वतःचा जीव धोक्यात घालून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपनिरीक्षकाने स्वसंरक्षार्थ आरोपीवर गोळीबार केला. या गोळीबारात अंकुश गंदमवार हा जखमी झाला आणि जागीच कोसळला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे.

काही तासांत आरोपी ताब्यात
एकीकडे सलग होणाऱ्या हत्यांमुळे नांदेड पोलिसांवर टीका होत असताना, अवघ्या काही तासांत आरोपींचा छडा लावून चकमकीत मुख्य आरोपीला पकडल्यामुळे पोलिसांच्या कारवाईचे कौतुक होत आहे. या कारवाईने गुन्हेगारांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, सोनू कल्याणकर हत्येचा संपूर्ण कट पोलिसांनी उघड केला आहे.

Web Title : सोनू कल्याणकर हत्याकांड: गिरफ्तारी के बाद चौथे आरोपी से पुलिस मुठभेड़

Web Summary : सोनू कल्याणकर की हत्या के बाद, नांदेड़ में पुलिस ने तीन नाबालिगों को गिरफ्तार किया। मुख्य संदिग्ध अंकुश गंदमवार के साथ मुठभेड़ हुई, जो घायल हो गया और उसे पकड़ लिया गया। पुलिस कार्रवाई की त्वरितता के लिए सराहना की गई।

Web Title : Sonu Kalyankar Murder: Police Encounter Fourth Accused After Arrests

Web Summary : After Sonu Kalyankar's murder, police in Nanded arrested three minors. A shootout ensued with the main suspect, Ankush Gandamwar, who was injured and apprehended. Police action praised for swiftness.