दिवसभर आईसगोळा विकला; रात्री घरी परताना हातगाडीवाल्यास अज्ञात वाहनाने चिरडले

By श्रीनिवास भोसले | Published: May 9, 2023 11:33 AM2023-05-09T11:33:43+5:302023-05-09T11:34:59+5:30

अज्ञात वाहनाच्या धडकेत आईसगोळावाल्याचा जागीच मृत्यू, एकजण जखमी

Sold ice cubes all day; While returning home at night, the handcart was crushed by an unknown vehicle | दिवसभर आईसगोळा विकला; रात्री घरी परताना हातगाडीवाल्यास अज्ञात वाहनाने चिरडले

दिवसभर आईसगोळा विकला; रात्री घरी परताना हातगाडीवाल्यास अज्ञात वाहनाने चिरडले

googlenewsNext

उमरी : अज्ञात  वाहनाने धडक दिल्याने उमरी जवळील नागठाणा येथे एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात एक जण किरकोळरित्या जखमी झाला आहे.

बाबूशा बळीराम घटमल वय ६० वर्षे रा.उमरी असे अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे.  बाबुशा घटमल व नंदू वर्मा हे दोघे जण आईसगोळा विकून आपला उदरनिर्वाह चालवितात. आईस गोळा विकून आपला हातगाडा ढकलीत बाबूशा  घटमल व नंदू वर्मा असे दोघेजण सोमवारी रात्री  आठ वाजताच्या सुमारास उमरीकडे येत होते . यावेळी नागठाणा खुर्द या गावाजवळ अचानक पाठीमागून आलेल्या एका वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. 

या अपघातात  गंभीर दुखापत होऊन बाबूशा घटमल यांचा  जागीच मृत्यू झाला.  तर नंदू वर्मा यांना किरकोळ दुखापत झाली. मात्र ते या अपघातातून  वाचले. घटनेचे वृत्त समजतात पोलीस उपनिरीक्षक एम. एन. चेवले, पचलिंग, सिध्दार्थ केळकर आदींनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या अपघात प्रकरणी पोलीस अज्ञात वाहनाचा शोध घेण्याचे काम करीत आहेत.

Web Title: Sold ice cubes all day; While returning home at night, the handcart was crushed by an unknown vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.