शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
2
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
3
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
4
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
5
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
6
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
7
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
8
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
9
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
10
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
11
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
12
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
13
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
14
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
15
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
16
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
17
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
18
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
19
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
20
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात

हदगाव प्रशासनाच्या विरोधात आतापर्यंत पाच जणांचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 1:02 AM

तालुक्यातील महसूल विभाग, नगरपालिका व मनाठा पोलीस ठाण्याच्या कामकाज पद्धतीविरुद्ध आतापर्यंत पाच जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असून मनाठा पोलिसांची बदली करण्यासंदर्भात आत्मदहन करण्याचा इशारा पोलीस महासंचालक यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

सुनील चौरे ।हदगाव : तालुक्यातील महसूल विभाग, नगरपालिका व मनाठा पोलीस ठाण्याच्या कामकाज पद्धतीविरुद्ध आतापर्यंत पाच जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असून मनाठा पोलिसांची बदली करण्यासंदर्भात आत्मदहन करण्याचा इशारा पोलीस महासंचालक यांना निवेदनाद्वारे दिला आहे. यामुळे या विभागाच्या कामकाजासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.चोरंबा खुर्द येथील रुद्राजी झुरोळे नावाच्या शेतकऱ्याला तलाठी सातबारा देत नसल्याने ते तहसीलदारांकडे गेले. त्यांनी हे काम माझे नाही म्हणून त्यांना पळविले.तोच राग मनात धरुन शेतकºयाने विषारी औषध प्राशन करण्याचा प्रयत्न केला. पण प्रसंगावधान राखून कर्मचा-यांनी त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. यानंतर वायफना येथील शेतकरी तथा उपसरपंच संतोष माने यांनी वडिपार्जित जमीन वडिलाच्या मृत्यूनंतर आपल्या नावे होत नसल्याने तहसीलच्या दालनातच केरोसीन अंगावर ओतले होते. यामध्ये ते थोडक्यात बचावले.तिसरी घटना, कवाना येथील दत्तात्रेय अनंतवार यांचे अंगरक्षक पद काढून घेतले. पोलीस अधीक्षक आयजी गुन्हा अन्वेषण यांच्याविरोधात पुरावे जमा करुन महासंचालकाकडे तक्रारी केल्याच्या कारणावरुन त्यांच्यावर खोटे गुन्हे नोंदविण्यात आले व तक्रारी मागे घेण्यास भाग पाडल्यावरुन त्यांनी मंत्रालयातच आत्मदहनाचा प्रयत्न केला. यामुळे मनाठा पोलिसांसह जिल्ह्याची पोलीस यंत्रणाही हदरली होती.११ डिसेंबर रोजी संजय पावडे नावाच्या शेतक-याचे रिकामे ट्रॅक्टर पकडून पोलिसांनी ठाण्यात लावले. लाकडे नेल्याचा आरोप त्यांच्यावर होता. गुन्हा न नोंदविता ट्रॅक्टर सोडविण्यासाठी त्यांच्याकडे पैशाची मागणी केली. परंतु, शेतक-यांनी विरोध केला. यावरुन वाद झाला. मग जाचाला कंटाळलेल्या शेतक-याने सोमवारी पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न केला.उपस्थितांनी वेळीच त्यांना अडविले. दोन दिवस हदगावच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेतले. लगेच शासकीय कामात अडथळा आणला म्हणून त्यांच्यावर गुन्हा नोंदवून आपली बाजू पोलिसांनी मांडली.हदगावच्या नगरसेविका विद्या भोस्कर प्रभागातील हातपंप दुरुस्तीची मागणी केली होेती. मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केले. यामुळे कंटाळून त्यांनी आत्महत्येचा इशारा दिला होता. शेवटी लेखी हमीपत्र देवून हे प्रकरण मिटविले. याविषयी मनाठा पोलीस ठाण्याचे सपोनि आर. डी. पांचाळ म्हणाले, ट्रॅक्टरवर गुन्हा नोंदवू नये यासाठी त्याने दबाव टाकण्यासाठी हे नाटक केले. त्यांच्या अंगावर विष पडले. ते पोटात गेले नाही.पोलीस, महसूल प्रशासनाकडून त्रास

  • तालुक्यातील महसूल विभाग, नगरपालिका व मनाठा पोलीस ठाण्याच्या कामकाज पद्धतीविरुद्ध आतापर्यंत पाच आत्महत्येचे प्रयत्न झाले़
  • चोरंबा खुर्द येथील रुद्राजी झुरोळे नावाच्या शेतकºयाला तलाठी सातबारा देत नसल्या- प्रकरणी मनस्ताप झाल्याने विषारी औषध प्राशन करण्याचा प्रयत्न केला़
  • कवाना येथील दत्तात्रेय अनंतवार यांचे अंगरक्षकपद काढून घेतल्याप्रकरणी त्यांनी मंत्रालयातच आत्मदहनाचा प्रयत्न केला होता़
  • संजय पावडे या शेतक-याचे रिकामे ट्रॅक्टर पकडून पोलिसांनी ठाण्यात लावले होते़ याप्रकरणी त्यांनी पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न केला़
  • नगरसेविका भोस्कर यांनीही आत्महत्येचा इशारा दिला होता़
टॅग्स :NandedनांदेडagitationआंदोलनNanded policeनांदेड पोलीस