शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मुदखेडातील सीता नदी पडली कोरडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 00:38 IST

या वर्षीच्या तीव्र उन्हामुळे तालुक्यातील विशेषत: ग्रामीण भागातील अनेक गावांना पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. तालुक्यातील मुख्य जिवनदायनी असलेली सीता नदी कोरडी पडली असून या वन्यप्राण्यासह, जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याच चित्र आहे.

ठळक मुद्देभीषण पाणीटंचाई संकट इसापूर धरणाचे पाणी सोडण्याची मागणीवन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती

मुदखेड : या वर्षीच्या तीव्र उन्हामुळे तालुक्यातील विशेषत: ग्रामीण भागातील अनेक गावांना पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. तालुक्यातील मुख्य जिवनदायनी असलेली सीता नदी कोरडी पडली असून या वन्यप्राण्यासह, जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याच चित्र आहे.टंचाईमुळे परिसराला दुष्काळाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत. शासनाने या बाबतीत गंभीर दखल घेऊन या परिसरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी ईसापूर धरणातील पाणी सीतानदीला तात्काळ सोडावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.मुदखेड तालुक्यातील मुदखेड, बारड, निवघा, शेंबोली, पांढरवाडी, डोंगरगाव, पार्डी, वैजापुर, बोरगाव हा सधन व बागायती भाग म्हणून ओळखला जातो. इसापूर धरणातील पाण्यामुळे या भागातील शेतकरी केळी, ऊस, गहू पिके भाजीपाला घेत सुखी समाधानी जिवन जगतो आहे. परंतु या धरणातून होणारा पाणीपुरवठा थांबला की या भागात कधी नव्हे एवढी पाण्याची टंचाई निर्माण होत असते. घोटभर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असते.मे च्या कडक उन्हामुळे पाणी टंचाई निर्माण झाली असून पाणी टंचाई दूर करण्यासाठी ईसापूर धरणातील पाणी सीता नदीत सोडावे अशी एकमुखी मागणी होत आहे. कारण सध्याच्या परिस्थितीत सीता नदी कोरडी पडली असून परिसरातील विहिरींनी तळ गाठला आहे. बोरवेल बंद पडले आहेत.पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून जनावरांच्या चाऱ्याच्या समस्येने गंभीर रुप धारण केले आहे. शेतकऱ्यांना आजपर्यंत दुष्काळाचे फारसे चटके या परिसराला बसले नाहीत. परंतु चालू वर्षी मात्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे़ जनावरांचा चारा, पाणी तसेच या परिसरातील असणाºया गावांना होणारा जलपुरवठा पुर्णपणे बंद झाल्याने नागरिकांची पिण्याच्या पाण्याची समस्या फार गंभीर बनली आहे.पाणी टंचाईमुळे सर्वच बाजूंनी शेतकरी अडचणीत सापडला असून प्रशासनाने या परिसराची पाहणी करून पाणी टंचाई दूर करण्यासाठी ईसापूर धरणातील पाणी सोडावे. तसेच योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी या परिसरातील शेतक-यांकडून होत आहे.केळीच्या बागा पाण्याअभावी करपल्यासीता नदीला पाणी सोडले नाही तर शासनाला या परिसरात चारा छावण्या उभ्या कराव्या लागतील. कारण या परिसरात दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात असल्याने या भागात जनवरांचे प्रमाण फार मोठे आहे.प्रशासनाला तातडीने या परिसरातील दुष्काळाचा विचार करावा लागणार आहे. त्याचप्रमाणे या परिसरातील शेती पूर्णपणे वाढत्या तापमानामुळे करपत असून, केळीच्या बागा तसेच ऊस व जनावरांचा चारा पाण्याअभावी जळून जात आहे.स्तसेच शेतमालाला बाजारभाव नसल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला असून शेतकरी पूर्णपणे हतबल झाले आहेत. पाणी टंचाईमुळे सर्वच बाजूंनी शेतकरी अडचणीत सापडला असून प्रशासनाने या परिसराची पाहणी करून पाणी टंचाई दूर करण्यासाठी ईसापूर धरणातील पाणी सोडावे.

टॅग्स :Nandedनांदेडriverनदीdroughtदुष्काळwater scarcityपाणी टंचाई