थोडक्यात महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:34 IST2021-02-21T04:34:06+5:302021-02-21T04:34:06+5:30

धर्माबाद (लक्ष्मण तुरेराव) तालुक्यातील बेल्लूर(बु.) येथील महानाम अर्जुन बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या धर्माबाद तालुकाध्यक्षपदी निवड ...

In short important | थोडक्यात महत्त्वाचे

थोडक्यात महत्त्वाचे

धर्माबाद (लक्ष्मण तुरेराव) तालुक्यातील बेल्लूर(बु.) येथील महानाम अर्जुन बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या धर्माबाद तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

यांना नियुक्तीपत्र देताना ज्येष्ठ नेते डॉ. व्यंकट भोसले सुभेदार, कपिल जुनेकर (जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय, नांदेड). ते प्रकाश सोनटक्केंसह अन्य मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

या निवडीबद्दल राष्ट्रवादीचे रवी शेठ्ठी, सुधाकर जाधव, भोजराज गोणारकर, हानमंत पाटील जगदंबे, पंडित पाटील, नागेंद्र पाटील, किरण गजभारे यांनी अभिनंदन केले आहे.

अवकाळी पावसाने गावागावात रस्ते बनले निसरडे

निवघाबाजार : परिसरात काल झालेल्या अवकाळी पावसामुळे गावातील अंतर्गत रस्ते निसरडे बनले आहेत. यामुळे ये - जा करणारांचे पाय घसरून पडत आहेत.

प्रत्येक गावात सिमेंट रस्ते झाले आहेत; परंतु रस्ते दर्जाहीन झाल्याने गावातील सिमेंट रस्ते उखडले आहेत, तर प्रत्येक गावात घरांचे नवीन बांधकाम सुरू असल्याने भिंतीची माती रस्त्यावर पडल्याने आणि अवकाळी पाऊस पडल्याने रस्ते चिखलमय बनले आहेत. यामुळे शाळेत ये- जा करणारे विद्यार्थी पाय घसरून पडत आहेत.

ग्रामसेवकाचे नांदेड येथून अप- डाऊन

कुंटूर : नायगाव तालुक्यातील कुंटूर ग्रामपंचायतीतील ग्रामसेवकाला मुख्यालय येथे चार, पाच दिवसाला भेटी देऊन जातात. नागरिकांना प्रमाणपत्रासाठी ग्रामसेवकाला फोनवरून संपर्क साधावा लागतो. त्यामुळे नागरिकांना प्रमाणपत्रासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कुंटूर येथील ग्रामपंचायत ही सर्वांत मोठी ग्रामपंचायत असलेले गाव आहे. गावात मागासवर्गीय वस्तीतील नळ पाणीपुरवठा योजना रखडली आहे. आठ महिन्यांपासून मागासवर्गीय वस्तीतील नळ पाणीपुरवठा अर्धवट सोडून गेले आहेत. पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गावात स्वच्छता अभियान राबविण्यात आले नाही. सर्वत्र केरकचरा, घाण पाणी रस्त्यावर सोडले जाते. ग्रामसेवक हे नांदेड येथे राहून कारभार पाहत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

Web Title: In short important

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.