धक्कादायक ! मुदखेडात धाड टाकण्यास गेलेल्या पोलिस उपनिरीक्षकाला शिवीगाळ करत धक्काबुक्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 17:43 IST2019-03-22T17:40:12+5:302019-03-22T17:43:28+5:30
या घटनेमुळे शहरात तणाव निर्माण झाला होता़

धक्कादायक ! मुदखेडात धाड टाकण्यास गेलेल्या पोलिस उपनिरीक्षकाला शिवीगाळ करत धक्काबुक्की
नांदेड : मुदखेड येथे एका घरात गोमांस असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी धाड मारण्यासाठी गेलेल्या पोलिस उपनिरीक्षकाला जमावाने शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली़ त्यानंतर हा जमाव पोलिस ठाण्यावर धडकला़ या घटनेमुळे शहरात तणाव निर्माण झाला होता़
मुदखेड येथे एका घरात गोमांस असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक शिंदे हे त्या ठिकाणी एकटेच गेले होते़ खुरेशी गल्लीमध्ये एका घरात ते तपासणी करीत असताना जमावाने त्यांना अटकाव केला़ तसेच शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली़ त्यामुळे शिंदे यांना माघारी परतावे लागले़ त्याच दरम्यान जमाव पोलिस ठाण्यावर धडकला़ यावेळी जमावाने पोलिस ठाण्यात घुसण्याचा प्रयत्न केला़ त्यामुळे तणाव निर्माण झाला होता़ घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे यांनी मुदखेड ठाणे गाठले़