शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

धक्कादायक ! कर्जबाजारी शेतकऱ्याने स्वतःच सरण रचून केली आत्महत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 4:23 PM

पोतन्ना रामन्ना बलपीलवाड (65) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

उमरी (नांदेड ) : कर्ज आणि सततच्या नापिकीस कंटाळून एका शेतकऱ्याने स्वतःचे सरण रचून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि.९ ) सायंकाळी उघडकीस आली. पोतन्ना रामन्ना बलपीलवाड (65) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

तेलंगणा राज्याच्या सीमेवरील तालुक्यातील तुराटी या गावी पोतन्ना रामन्ना बलपीलवाड यांची गाव शिवारात शेत जमीन आहे. दुष्काळामुळे शेतात नापिकी आणि डोक्यावरील कर्ज यास ते कंटाळले होते. यातूनच शुक्रवारी दुपारी ते शेतात गेले व सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास त्यांनी स्वतःच सरण रचून आत्महत्या केली. त्यांच्यावर भारतीय स्टेट बँकेचे २ लाख व जिल्हा सहकारी बँकेचे ४० हजार असे एकूण २ लाख ४० हजारांचे कर्ज होते. वारकरी संप्रदायाचे अनुकरण करणारे पोतन्ना यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व पाच विवाहित मुली आहेत. विशेष म्हणजे पाचही मुली माहेरी आलेल्या आहेत. 

राहिली फक्त राख आणि हाडे खूप वेळ झाला तर पोतन्ना परत आले नसल्याने मुलगा व पुतण्या त्यांच्या शोधात शेतात आले. यावेळी निखाऱ्यावर पसरलेली राख आणि हाडे पाहून त्यांना धक्का बसला. घटनेची माहिती समजताच पोलिस उपनिरीक्षक सुदर्शन सुर्वे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृतदेहाची पूर्णपणे राख व कोळसा झाल्याने अधिकारी डॉक्टर नारायण कस्तुरे यांनी घटनास्थळावरील जळालेल्या मृतदेहाचे नमुने घेतले. 

टॅग्स :Farmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्याNandedनांदेड