नांदेड-भोकर महामार्गावर खड्ड्यांमुळे अपघाताची मालिका; ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 14:55 IST2025-10-16T14:52:24+5:302025-10-16T14:55:02+5:30
याच मार्गावर अन्य एका अपघातात दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

नांदेड-भोकर महामार्गावर खड्ड्यांमुळे अपघाताची मालिका; ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
बारड (जि.नांदेड) : भरधाव आयसर ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना नांदेड-भोकर महामार्गावर डोंगरगाव पाटीजवळ १५ ऑक्टोबर रोजी घडली. दरम्यान, याच मार्गावर अन्य एका अपघातात दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
महामार्गावर जागोजागी खड्डे पडले असून वाहनांचे अपघात दररोज हाेत आहेत. आयसर ट्रक क्रमांक (एमएच १३ ए.एक्स. २९०४) च्या चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणे चालवून दुचाकी क्रमांक (एमएच २६ एम. ७१३०) ला जोराची धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार नवनाथ बालाजी हाळे हे जागीच ठार झाले. दरम्यान, अन्य एका अपघातात (एमएच २६ बी.ई. ०७२१) पीकअप गाडी व दुचाकी क्रमांक (एमएच २६ सी.एफ. ९७८९) ची धडक झाली. त्यात कृष्णा विजय पवार (वय १६, रा. वैजापूर पार्डी, ता. मुदखेड), युवराज मानेत नाईकवाडे (वय १६, रा. दुधनवाडी) दोघेजण गंभीर जखमी झाले. दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच महामार्ग मदत केंद्राच्या पोलीस उपनिरीक्षक डॉ. ज्योती कदम, कर्मचारी पवार, श्रीरामे, गुरुतवाड यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली.