शिवा कांबळे हे गेली तीस वर्ष सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि साहित्यक्षेत्रात मोलाचे योगदान देत आहेत. शिवा कांबळे हे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचे अभ्यासक असून, ‘प्रतिभेचा हिमालय : अण्णा भाऊ साठे’ या चरित्रग्रंथाचे लेखकही आहेत.
सन २०१७ साली साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीच्या वतीने अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचे (कादंबरी)चे दोन खंड प्रकाशित झाले आहेत. या समितीचे अध्यक्ष, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, उपाध्यक्ष, राज्यमंत्री उच्च व तंत्रशिक्षण तर सदस्य म्हणून प्रधान सचिव उच्च व तंत्रशिक्षण, सदस्य संचालक शासकीय मुद्रणालय तर निमंत्रक म्हणून संचालक उच्च व तंत्र उच्च शिक्षण, प्रा. डाॅ. शरद गायकवाड, ए.बी. अंभोरे, प्राचार्य डॉ माधव गादेकर, प्रा. डॉ बी. एन. गायकवाड, प्रा.डाॅ. सोमनाथ कदम, प्रा.डाॅ. दिलीप चव्हाण, सचिन साठे, प्रा. मिलिंद कसबे, प्रा.देवकुमार अहिरे, शिवा कांबळे, प्रा. डाॅ प्रमोद गारोडे, प्रा.डाॅ संजय शिंदे, प्रा.डॉ विजय कुमठेकर हे सदस्य आहेत, तर मल्लिका अमर शेख ह्या सदस्य सचिव म्हणून काम करणार आहेत.