शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
5
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
6
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
7
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
8
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
9
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
10
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
11
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
12
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
13
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
14
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
15
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
16
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
17
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
18
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
19
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
20
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?

दुसर्‍या टप्प्यात नांदेड जिल्ह्यात केवळ चारच रेती घाटांना बोली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 7:04 PM

नांदेड जिल्ह्यात दुसर्‍या टप्प्यात झालेल्या ५७ वाळू घाटाच्या लिलावात केवळ चार घाट लिलावात गेले असून उर्वरित घाटांना बोली मिळाली नसल्याचे चित्र स्पष्ट झाले़

ठळक मुद्देवाळूघाट लिलावाच्या पहिल्या टप्प्यात २७ वाळू घाटांतून १७ कोटींचे महसुली उत्पन्न प्रशासनास मिळाले होते. दुसर्‍या टप्प्यात झालेल्या ५७ वाळू घाटाच्या लिलावात केवळ चार घाट लिलावात गेले

नांदेड : जिल्ह्यात दुसर्‍या टप्प्यात झालेल्या ५७ वाळू घाटाच्या लिलावात केवळ चार घाट लिलावात गेले असून उर्वरित घाटांना बोली मिळाली नसल्याचे चित्र स्पष्ट झाले़

वाळूघाट लिलावाच्या पहिल्या टप्प्यात २७ वाळू घाटांतून १७ कोटींचे महसुली उत्पन्न प्रशासनास मिळाले होते. त्यानंतर दुसर्‍या टप्प्यास सुरुवात झाली. नांदेड जिल्ह्यात पर्यावरणविषयक बाबींची पूर्तता केल्याचा अहवाल सादर केल्यानंतर वाळूघाटाच्या लिलावास परवानगी मिळाली होती. ५७ वाळू घाटांच्या लिलाव प्रक्रियेत केवळ ४ वाळू घाट लिलावात गेले आहेत. त्यामध्ये मुदखेड तालुक्यातील चिलपिंपरी, हदगाव तालुक्यातील धोतरा आणि बिलोली तालुक्यातील चिरली तसेच बोळेगाव-२ या घाटांचा समावेश आहे. मुदखेड तालुक्यातील चिलपिंपरी घाटास ९ लाख ५२ हजार ४९२ रुपये बोलीतून मिळाले आहेत. या घाटाची प्रशासनाने निश्चित केलेली हातची किंमत ९ लाख १२ हजार ४९२ इतकी होती. हदगाव तालुक्यातील धोतरा घाटास १९ लाख २१ हजार ५९२ रुपये प्राप्त झाले आहे तर बिलोली तालुक्यातील चिरली घाटास ४८ लाख ९० हजार ३७० रुपयांचा महसूल मिळाला आहे. या घाटाची शासकीय हातची किंमत ४७ लाख ७० हजार ३७० इतकी होती. दरम्यान, या प्रक्रियेत माहूर तालुक्यातील सायफळ आणि पडसा या दोन वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया जिल्हा प्रशासनाने फेटाळून लावली आहे. या दोन्ही घाटाला वनविभागाने ना-हरकत प्रमाणपत्र दिले नव्हते. परिणामी इको झोनमध्ये असलेल्या या घाटांची लिलाव प्रक्रिया थांबविण्यात आली.

अबब...! बोळेगाव -२ घाटास मिळाले ९ कोटी ६५ लाखबिलोली तालुक्यातील बोळेगाव-२ या मांजरा नदीवरील वाळू घाटास यशवंत इंटरप्राईजेसने तब्बल ९ कोटी ६५ लाख ५५ हजारांची बोली लावली आहे. ५ हजार ८८ ब्रास वाळूचा उपसा करण्याची परवानगी असलेल्या या घाटाची हातची रक्कम ९५ लाख ५५ हजार २६४ रुपये इतकी ठेवली होती. या वाळूघाटास  हातच्या रक्कमेपेक्षा तब्बल दहापट अधिक बोली लागली आहे. त्यामुळे एकूण सीमावर्ती भागातील वाळूचे महत्त्व स्पष्ट होत आहे.