शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
3
Career News : आयआयटीच नव्हे, आता एलपीयूचे विद्यार्थीही मिळवत आहेत कोट्यवधी रुपयांचे पॅकेजेस!
4
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
5
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
6
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
7
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
8
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
9
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
10
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
11
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
12
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
13
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
14
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
15
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
16
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
17
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
18
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
19
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
20
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश

राज्य प्राथमिक शिक्षक संघातर्फे शनिवारी त्रैवार्षिक अधिवेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 00:55 IST

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या नांदेड शाखेतर्फे २३ फेब्रुवारी रोजी शहरातील कुसूम सभागृहात त्रैवार्षिक अधिवेशनासह शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

नांदेड : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या नांदेड शाखेतर्फे २३ फेब्रुवारी रोजी शहरातील कुसूम सभागृहात त्रैवार्षिक अधिवेशनासह शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी छत्रपती शिवाजी राजे प्रतिष्ठानच्यावतीने श्री गुरूगोविंदसिंघजी राज्य व जिल्हास्तरीय प्रेरणा पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते सकाळी १० वाजता या अधिवेशनाचे उद्घाटन होणार असून माजी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचे शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष जीवन वडजे यांनी सांगितले. या अधिवेशनाला जोडूनच शिक्षण परिषद घेण्यात येणार आहे. या परिषदेत शैक्षणिक व सामाजिक प्रश्नावर उद्बोधन करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अशोक काकडे, माजी शिक्षण संचालक गोविंद नांदेडे, सहायक शिक्षण संचालक सुधाकर तेलंग मार्गदर्शन करणार आहेत. या परिषदेत आ. डी.पी. सावंत यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येणार असून पुरस्कार वितरण कुलगुरू डॉ. उद्धव भोसले आणि आ. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते होणार आहे.या अधिवेशनाला शिक्षक संघाचे संभाजीराव थोरात यांच्यासह आ. अमरनाथ राजूरकर, आ. राम पाटील रातोळीकर, आ. अमिता चव्हाण, आ. सुभाष साबणे, आ. वसंतराव चव्हाण, आ. प्रदीप नाईक, आ. नागेश पाटील आष्टीकर, आ. हेमंत पाटील, आ. तुषार राठोड, जि.प. उपाध्यक्ष समाधान जाधव, शिक्षक संघाचे एन.वाय. पाटील, अप्पासाहेब कुल, अंबादास वाजे, अनुराधा तकटे, विद्युलता आढाव उपस्थित राहणार आहेत.अधिवेशनात यांचा होणार गौरवया अधिवेशनात राज्यस्तरीय पुरस्काराने सचखंड नांदेडचे बाबा बलविंदरसिंघ, जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई जवळगावकर, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, माजी शिक्षण संचालक गोविंद नांदेडे, सामाजिक कार्यकर्त्या राजश्री हेमंत पाटील, उद्योजक मारोतराव कवळे आणि जि.प. सदस्या प्रणिताताई देवरे चिखलीकर तसेच प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष बाळकृष्ण तांबारे (उस्मानाबाद) यांना गौरविण्यात येणार आहे. याबरोबरच जिल्ह्यातील ५० शिक्षकांचा उत्कृष्ट कार्याबद्दल गौरव करण्यात येणार असल्याचे जीवन वडजे यांनी सांगितले.

टॅग्स :NandedनांदेडEducationशिक्षणTeacherशिक्षकTeachers Councilशिक्षक परिषद