राज्य प्राथमिक शिक्षक संघातर्फे शनिवारी त्रैवार्षिक अधिवेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 00:55 IST2019-02-22T00:54:53+5:302019-02-22T00:55:22+5:30
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या नांदेड शाखेतर्फे २३ फेब्रुवारी रोजी शहरातील कुसूम सभागृहात त्रैवार्षिक अधिवेशनासह शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

राज्य प्राथमिक शिक्षक संघातर्फे शनिवारी त्रैवार्षिक अधिवेशन
नांदेड : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या नांदेड शाखेतर्फे २३ फेब्रुवारी रोजी शहरातील कुसूम सभागृहात त्रैवार्षिक अधिवेशनासह शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी छत्रपती शिवाजी राजे प्रतिष्ठानच्यावतीने श्री गुरूगोविंदसिंघजी राज्य व जिल्हास्तरीय प्रेरणा पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते सकाळी १० वाजता या अधिवेशनाचे उद्घाटन होणार असून माजी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचे शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष जीवन वडजे यांनी सांगितले. या अधिवेशनाला जोडूनच शिक्षण परिषद घेण्यात येणार आहे. या परिषदेत शैक्षणिक व सामाजिक प्रश्नावर उद्बोधन करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अशोक काकडे, माजी शिक्षण संचालक गोविंद नांदेडे, सहायक शिक्षण संचालक सुधाकर तेलंग मार्गदर्शन करणार आहेत. या परिषदेत आ. डी.पी. सावंत यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येणार असून पुरस्कार वितरण कुलगुरू डॉ. उद्धव भोसले आणि आ. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते होणार आहे.
या अधिवेशनाला शिक्षक संघाचे संभाजीराव थोरात यांच्यासह आ. अमरनाथ राजूरकर, आ. राम पाटील रातोळीकर, आ. अमिता चव्हाण, आ. सुभाष साबणे, आ. वसंतराव चव्हाण, आ. प्रदीप नाईक, आ. नागेश पाटील आष्टीकर, आ. हेमंत पाटील, आ. तुषार राठोड, जि.प. उपाध्यक्ष समाधान जाधव, शिक्षक संघाचे एन.वाय. पाटील, अप्पासाहेब कुल, अंबादास वाजे, अनुराधा तकटे, विद्युलता आढाव उपस्थित राहणार आहेत.
अधिवेशनात यांचा होणार गौरव
या अधिवेशनात राज्यस्तरीय पुरस्काराने सचखंड नांदेडचे बाबा बलविंदरसिंघ, जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई जवळगावकर, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, माजी शिक्षण संचालक गोविंद नांदेडे, सामाजिक कार्यकर्त्या राजश्री हेमंत पाटील, उद्योजक मारोतराव कवळे आणि जि.प. सदस्या प्रणिताताई देवरे चिखलीकर तसेच प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष बाळकृष्ण तांबारे (उस्मानाबाद) यांना गौरविण्यात येणार आहे. याबरोबरच जिल्ह्यातील ५० शिक्षकांचा उत्कृष्ट कार्याबद्दल गौरव करण्यात येणार असल्याचे जीवन वडजे यांनी सांगितले.