शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
2
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
3
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
4
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
6
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
7
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
8
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
9
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
10
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
11
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
12
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
13
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
14
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
15
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
16
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
17
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
18
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
19
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
20
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

संघ, भाजपाकडून राज्यघटनेला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 00:34 IST

अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असतानाच भाजपाने घटना पुनर्विलोकन समिती नियुक्ती केली होती. मात्र काँग्रेसच्या प्रखर विरोधानंतर तत्कालीन भाजपा सरकारला माघार घ्यावी लागली होती. आजही काही मंत्री भारतीय राज्यघटना बदलण्याची भाषा करतात.

ठळक मुद्देकाँग्रेस आक्रमक कुमार केतकर, राजू वाघमारे, कमलकिशोर कदम यांचा आरोप

नांदेड : अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असतानाच भाजपाने घटना पुनर्विलोकन समिती नियुक्ती केली होती. मात्र काँग्रेसच्या प्रखर विरोधानंतर तत्कालीन भाजपा सरकारला माघार घ्यावी लागली होती. आजही काही मंत्री भारतीय राज्यघटना बदलण्याची भाषा करतात. हे बरळत नाहीत तर ठरवून बोलतात, असे सांगत राष्टÑीय स्वयंसेवक संघ, भाजपाकडून घटनेला धोका असून या संघटनांचे मनुस्मृती आधारित व्यवस्था आणण्याचे कारस्थान असल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांच्यासह राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री कमलकिशोर कदम यांनी केला.खा. अशोकराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ खा. कुमार केतकर यांच्यासह राजू वाघमारे, कमलकिशोर कदम नांदेडमध्ये तळ ठोकून आहेत. यावेळी कमलकिशोर कदम म्हणाले की, नरेंद्र मोदी, अमित शहा हे देशावरील सर्वात मोठे संकट आहे. देशातील लोकशाही संपवून हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न सत्ताधारी भाजपाच्या वर्तनावरुन स्पष्ट होत आहे. विकासाची आश्वासने देवून सत्तेत आलेल्या भाजपाने मागील पाच वर्षे केवळ खोटे बोलून सर्वसामान्यांची फसवणूक करण्याचे काम केले. भाजपाचे लोक देशवासियांना जातीपातीच्या राजकारणात गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही कमलकिशोर कदम यांनी केला. काँग्रेससोबत काही ठिकाणी आमचे वैचारिक मतभेदही होतात. मात्र वैयक्तिक पातळीवर येवून आम्ही कधीही राजकारण केले नसल्याचे सांगत खा. अशोकराव चव्हाण यांना निवडून देणे काळाची गरज असल्याचे कदम म्हणाले.खा. कुमार केतकर यांनीही भाजपाचा समाचार घेतला. देशात काँग्रेसमुळेच विकास झाल्याचे सांगत नांदेडलाही शंकरराव चव्हाण आणि त्यानंतर अशोकराव चव्हाण यांचे नेतृत्व लाभल्यानेच या भागाचा कायापालट झाल्याचे ते म्हणाले. विशेषत: मराठवाड्यातील सिंचनक्षेत्र वाढीसाठी शंकरराव चव्हाणांनी दिलेले योगदान ऐतिहासिक असल्याचे त्यांनी सांगितले. सध्याचे सरकार सर्वस्तरातील नागरिकांची मुस्कटदाबी करण्याचे प्रयत्न करीत आहे. मोदी, शहा यांची ही हुकूमशाहीची राजवट बाजूला सारुन सर्वांना सोबत घेऊन जाणाऱ्या काँग्रेसला बळ देण्याची आवश्यकता केतकर यांनी व्यक्त केली.राजू वाघमारे यांनी विद्यमान भाजपा सरकार रिझर्व्ह बँक, सीबीआय यासारख्या देशातील सार्वजनिक संस्था मोडीत काढून देशात अराजकता माजविण्याचा प्रयत्न करीत आहे. निवडणूक आयोगाने तंबी दिल्यानंतरही खुद्द पंतप्रधानच शहीद जवानांच्या आडून भाजपाला मते मागत आहेत. हा प्रकार संतापजनक असल्याचे सांगत भाजपाच्या अशा पद्धतीच्या वर्तवणुकीमुळे देशात लोकशाहीचा खून होत असल्याचे वाघमारे म्हणाले. भाजपाप्रणीत असलेल्या एका सहयोगी संस्थेकडूनच संसदेपासून अगदी काही अंतरावर भारतीय राज्यघटना जाळण्याचे पाप झाले. विशेष म्हणजे या धक्कादायक प्रकाराबाबत ना मोदी काही बोलले, ना अमित शहा. अशा प्रकारे चुप्पी साधून एकप्रकारे भाजप राज्यघटनेला विरोध करणाऱ्यांना मूक पाठिंबाच देत असल्याचा आरोपही वाघमारे यांनी केला.विकासाची दृष्टी काँग्रेसकडेचदेशात टीव्ही, मोबाईल काँग्रेसच्या राजीव गांधींनी आणून आधुनिक क्रांती केली. मात्र मागील पाच वर्षांत विकासाची ही प्रक्रिया थांबली आहे.भाजपाकडून दुहीचे राजकारणसर्व जाती, धर्मांना सोबत घेऊन पुढे जाण्याची काँग्रेसची वृत्ती आहे. मात्र जाती, धर्मात तेढ वाढवून भाजपा देशात दुहीचे राजकारण करत आहे.अशोक चव्हाणच सक्षम नेतृत्वपाच वर्षांतील युतीच्या कारभारामुळे विकासकामांना खीळ बसली आहे. नांदेडच्या विकासासाठी अशोक चव्हाण हेच सक्षम नेतृत्व आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnanded-pcनांदेडcongressकाँग्रेसBJPभाजपाAshok Chavanअशोक चव्हाण