धुक्यामुळे धावपट्टी दिसेना, नांदेडमध्ये विमानाच्या तासभर हवेत घिरट्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 12:04 IST2025-01-11T12:03:38+5:302025-01-11T12:04:03+5:30
शनिवारी सकाळी बंगलोर येथून नांदेडला 70 प्रवाशी घेऊन स्टारएअर कंपनीचे विमान आले होते.

धुक्यामुळे धावपट्टी दिसेना, नांदेडमध्ये विमानाच्या तासभर हवेत घिरट्या
नांदेड : धुक्यामुळे धावपट्टी दिसत नसल्याने बेंगलुरहून प्रवासी घेउन नांदेडला आलेला विमान तासभर हवेतच घिरट्या घालत होते. तिसऱ्या प्रयत्नात हे विमान जमिनीवर सुखरूप उतरविण्यात पायलटला यश आले त्यामुळे विमानातील 70 प्रवाशांचा जीव भांड्यात पडला.
शनिवारी सकाळी बंगलोर येथून नांदेडला 70 प्रवाशी घेऊन स्टार एअर कंपनीचे विमान आले होते. परंतु दाट धुक्यामुळे धावपट्टी दिसत नव्हती. त्यामुळे पायलटने दोन वेळा विमान खाली उतरविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिसऱ्या वेळी विमान धावपट्टीवर उतरले. त्यामुळे तासभर विमान हवेत घिरट्या घालत होते. विमानातील प्रवाशी घाबरले होते पण पायलट आणि विमान कर्मचाऱ्यांनी त्यांना धीर दिला. तिसऱ्या प्रयत्नात विमान सुखरूप खाली उतरले आणि प्रवाशांचा जीव भांड्यात पडला.
धुक्यामुळे धावपट्टी दिसेना, नांदेडमध्ये विमानाच्या तासभर हवेत घिरट्या #nanded#marathwada#Fog_Alertpic.twitter.com/WF2EEPAS1I
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) January 11, 2025